देव तारी त्याला कोण मारी. – दरीत उडी घेणारी युवती सुखरूप
सावंतवाडी:-प्रतिनिधी. १५
आंबोली घाटातील दरीत उडी घेतलेल्या त्या युवतीला अखेर रेस्क्यू टीमच्या सहकार्याने सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आले आहे. तिच्या पाठीला किरकोळ दुखापत झाली असून उपचारार्थ तिला आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. सदर युवती अहमदनगर येथील असून तिचे नाव कमल असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
👉सावंतवाडीहुन एसटीने ती आंबोली येथे गेली होती व तिथून एका रिक्षाने ती आंबोली धबधब्याकडे आली होती. तेथूनच काही अंतरावर चपला व ओढणी बाजूला ठेवून तिने दरीत अचानक उडी घेतली. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी रेस्क्यू टीम च्या सहाय्याने तिला सुखरूप बाहेर काढले. मात्र तिने नेमकी उड़ी कोणत्या कारणासाठी घेतली याबाबतची माहिती अजून प्राप्त झाली नसून पोलिस अधिक तपास करीत आहेत. घटनास्थळी सावंतवाडी पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर दाखल झाले आहेत.
