Homeकोंकण - ठाणेशिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदेंविषयी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट.- मराठी कलाकार...

शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदेंविषयी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट.- मराठी कलाकार मयुरेश कोटकरला अटक.

शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदेंविषयी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट.- मराठी कलाकार मयुरेश कोटकरला अटक

नवीमुंबई.प्रतिनिधी. १५

शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध समाज माध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी मराठी कलाकाराला अटक करण्यात आली आहे. मराठी कलाकार मयुरेश कोटकर यांना ठाण्यातील श्रीनगर पोलिसांनी अटक केली. कोटकर यांना आता कोर्ट कोठडी सुनावण्यात आलेली आहे. मयुरेश कोटकर यांनी अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
नवी मुंबई येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी दि बा पाटील यांचे नाव देण्यात यावे, यासाठी आगरी समाजाने रस्त्यावर उतरुन मानवी साखळी तयार केली होती. त्यावेळीही मयुरेश कोटकर उतरले होते. त्यानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध कोटकरांनी समाज माध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट केली होती.त्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांकडून पोलिस स्थानकात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला होता. अटकेनंतर कोटकर यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यांना आज जामीन मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.