Homeकोंकण - ठाणेदेशात गेल्या २४ तासात आढळले ६२,२२४ नवीन कोरोना रुग्ण.- २५४२ बाधितांचा मृत्यू.

देशात गेल्या २४ तासात आढळले ६२,२२४ नवीन कोरोना रुग्ण.- २५४२ बाधितांचा मृत्यू.

देशात गेल्या २४ तासात आढळले ६२,२२४ नवीन कोरोना रुग्ण.- २५४२ बाधितांचा मृत्यू

नवी दिल्ली – वृतसंस्था.१६

देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरतांना दिसत आहे. दिवसेंदिवस कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. अनेक राज्यांमध्ये अनलॉक प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. तर, कोरोना परिस्थिती पाहून निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल केले जात आहेत. दररोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्याची संख्या वाढत आहे. मात्र अद्यापही कोरोनाबाधित रूग्णांची मृत्यू संख्या कमी झालेली नाही. देशात गेल्या २४ तासात ६२,२२४ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. तर १,०७,६२८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच गेल्या २४ तासात २५४२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या दिलेल्या माहितीनुसार देशातील कोरोनाची परीस्थिती आटोक्यात येत आहे. आतापर्यंत देशात २,९६,३३,१०५ रुग्ण आढळले आहेत. तर २,८३,८८,१०० बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. ३,७९,५७३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या देशात ८,६५,४३२ बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

नविन कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त

देशात नविन कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. १५ जूनपर्यंत देशभरात २८,००, ४५८ नागरिकांना लस देण्यात आली आहे. आतापर्यंत २६,१९,७२,०१४ नागरीकांचे लसीकरण झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.