🛑पोलीस भरतीला गालबोट.
( २३ वर्षांच्या तरुणाचा मैदानातच मृत्यू.)
🛑दरोड्यातील आरोपीला ३० वर्षांनी ७ वर्षे सक्तमजुरीसह दंडाची शिक्षा
🛑 वेश्या व्यवसायाचा पोलीसांनी केला पर्दाफाश.- पोलीसांकडून अड्डा उध्वस्त.
( पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी.)
चिपळूण :- प्रतिनिधी.
चिपळूण शहरातील मार्कंडी भागात एका गल्लीत असलेल्या एका अपार्टमेंटच्या शेवटच्या मजल्यावर असणारा वेश्या व्यवसायाचा अड्डा पोलिसांनी काल शुक्रवारी रात्री उध्वस्त केला आहे. या वेळी दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली तर एका संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले. येथे दोन एजंट होते, पैकी एकला पकडण्यात पोलिसांना यश आले असून एकजण फरार झाला. या घटनेने खळबळ उडाली आहे.
🔴जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांना माहिती मिळाल्यानुसार अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलीस उपाधीक्षक राजेंद्र कुमार राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे व सहकारी सदर ठिकाणी गेले दोन दिवस पळत ठेऊन होते. पोलीस कर्मचारी व क्राईम ब्रँचच्या टीमने काल संयुक्त कारवाई केली असता ‘तिशा’मध्ये 27 व 30 वर्षे वयाच्या दोन पीडित महिला व एक पुरुष एका सदनिकेत सापडले.
🟥पोलिसांनी त्यांना व एका एजंटला ताब्यात घेतले तर एक एजंट पळून जाण्यात यशस्वी झाला. येथे गेले चार महिने वेश्या व्यवसाय चालत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी सर्वांना पोलीस स्टेशनला आणून चोकशी सुरु केली होती. रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे, सहा.पोलीस निरीक्षक प्रवीण देशमुख, महिला पोलीस उपनिरीक्षक शिल्पा वेंगुर्लेकर, पोलीस उपनिरीक्षक अरुण जाधव, हवालदार वृशाल शेटकर, पो. कॉ. प्रमोद कदम, राहुल दराडे, श्री.आवळे यांच्या टीमने ही यशस्वी कामगिरी केल्याने त्यांचे कौतुक होत आहे.
🟥खेडमधील दरोड्यातील आरोपीला ३० वर्षांनी ७ वर्षे सक्तमजुरीसह दंडाची शिक्षा
खेड :- प्रतिनिधी.
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शिव येथे दि. १३ नोव्हेंबर १९९४ रोजी परकार कुटुंबाच्या घरात साथीदारांना घेऊन सशस्त्र दरोडा घालणाऱ्या शाम बिंद्रावन कैथवास ( मौजे रा . सावरगांव ता. जि. वाशिम ) याला खेड पोलिसांनी तब्बल ३० वर्षांनी अटक करुन घेऊन खेड न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला ७ वर्षे सक्तमजुरीसह १ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. यावेळी न्यायालयाने या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे बक्षिस म्हणून दंडाच्या रकमपैकी २५ हजार ही पोलिस कल्याण निधीला देण्याचे आदेश दिले आहेत.
🟥याबाबत उपलब्ध झालेल्या माहितीनुसार , दि.१३ नोव्हेंबर १९९४ रोजी शाम बिंद्रावण कैथवास याने खेड तालुक्यातील मौजे शिव येथील इब्राहिम अहमद परकार यांचे घरी पहाटेचे वेळी आपले साथीदारांसोबत सशस्त्र दरोडा टाकला. इब्राहीम अहमद परकार यांचे डोक्यात वार केला होता तर त्यांचे सुनांना आणि इतर घरातील व्यक्तींना चाकूचा धाक दाखवून घरातील सोन्याचे दागदागिने , किमती घडयाळे आणि रोकड चोरुन नेली होती. दरोडा टाकून शाम बिंद्रावण कैथवास हा फरार झाला होता . या प्रकरणी ३० वर्षांपूर्वी खेड पोलिस ठाण्यात ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता . यातील दोन आरोपींचा मृत्यू झाला व बाकी आरोपी फरार होते . त्यापैकी मुख्य आरोपी शाम बिंद्रावन कैथवास हा जुलै २०२३ मध्ये पोलिसांना सापडला. त्याला रत्नागिरी कारागृह येथे ठेवून त्याच्या विरुध्द खेड न्यायालयात खटला चालवण्यात आला.
🔴अतिरिक्त सत्र न्यायालय – १ खेडचे न्यायाधिश डॉ . सुधीर एम . देशपांडे यांनी शाम बिंद्रावन कैथवास ( रा . सावरगांव ता . जि . वाशिम ) यांस ७ वर्षे सश्रम कारावास आणि रुपये १ लाख रुपये इतका दंड आणि दंड न भरल्यास एक वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे . पोलिसांनी ३० वर्षानंतर आरोपीस पकडून आणून केस संदर्भातील कागदपत्रे आणि पुरावे जतन करुन आवश्यक साक्षीदार आणि इतर कागदपत्रे न्यायालयासमोर हजर केल्याचे कौतुक करून न्यायाधीश यांनी दंडातील २५ हजार रुपये ही रक्कम पोलिस कल्याण निधीला भरण्याचे आदेश दिले.या खटल्यात सरकारी पक्षातर्फे पाच साक्षीदार तपासण्यात आले. आणि परिस्थितीजन्य पुरावा कोर्टासमोर मांडणेत आला. या प्रकरणी इब्राहीम अहमद परकार ( ९ २ ) यांची साक्ष महत्वाची ठरली. सरकारी वकील ॲड. सौ. मृणाल जाडकर यांनी सरकार पक्षाच्या बाजुने युक्तीवाद करुन संपुर्ण केसचे कामकाज पाहिले. या खटल्यात तपासिक अंमलदार पोलिस निरीक्षक पी . एस. सातोसे तसेच कोर्ट पैरवी चंद्रमुनी ठोके यांचे न्यायालयाला सहकार्य लाभले.
🛑पोलीस भरतीला गालबोट.
( २३ वर्षांच्या तरुणाचा मैदानातच मृत्यू.)
नवी मुंबई :- वृत्तसंस्था.

राज्यातल्या वेगवेगळ्या भागात सध्या पोलीस भरती प्रक्रिया सुरु आहे. पोलीस दलात सहभागी होण्याचं, त्या माध्यमातून देशसेवा करण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हजारो तरुण या भरतीच्या ठिकाणी गर्दी करत आहेत. राज्यातील या पोलीस भरतीला गालबोट लावणारी घटना शनिवारी (२९ जून) नवी मुंबईत घडलीय.
🅾️नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमधील पोलीस भरती प्रक्रियेत अक्षय बिर्हाडे हा २३ वर्षांचा तरुण सहभागी झाला होता. अक्षय बिर्हाडे हा जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेरचा राहणारा होता. एस. आर. पी. भरती ग्रुप क्रमांक ११ या ठिकाणी धावपट्टीवर धावत असताना अक्षय मैदानात कोसळला. त्यानंतर अत्यावस्थ अवस्थेमध्ये तातडीनं कळवामधील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्याम त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या रुग्णालयात राज्य राखीव दल, पोलीस दल तैनात करण्यात आले आहेत.
🅾️अक्षय बिर्हाडे ५०० मीटरचा टप्पा धावून पूर्ण करण्याच्या आधीच मैदानात कोसळला होता. त्याच्यावर वेळीच उपचार झाले नाहीत, असा आरोप नातेवाईंकांनी केलाय. शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू असून अक्षयला हृदयविकाराचा झटका आला की त्यांनी काही सेवन केले होते.याची तपासणी रुग्णालयाकडून करण्यात येणार आहे.शवविच्छेदनानंतरच त्याच्या मृत्यूचं कारण समजू शकेल, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.