Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रगडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात शिवसेना शिंदे गट.- आजरा तालुका पदाधिकारी यांची कामकाजा संदर्भात...

गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात शिवसेना शिंदे गट.- आजरा तालुका पदाधिकारी यांची कामकाजा संदर्भात बैठक.

गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात शिवसेना शिंदे गट.- आजरा तालुका पदाधिकारी यांची कामकाजा संदर्भात बैठक.

गडहिंग्लज.- प्रतिनिधी.

भादवण येथील दोन दिवसांपूर्वी सर्पदंश झालेल्या महिलेचा मृत्यू झाला होता त्याचा जाब विचारण्यासाठी शिवसेना ( शिंदे गट ) तालुकाप्रमुख संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर खोत यांची भेट घेऊन त्यांना जाब विचारण्यात आला सदर रुग्णाला साप चावल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय सूचीनुसार योग्य ती उपचार न देता अपुरे उपचार करून उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले तोपर्यंत बराच वेळ गेला उपजिल्हा रुग्णालय येथे व्हेंटिलेटर ची सोय नसल्यामुळे सदर पेशंटला खाजगी दवाखान्यात पाठवावे लागले योग्य वेळेत उपजिल्हा रुग्णालयाकडून पुढील उपचार न मिळाल्यामुळे पेशंट दगावला या उपजिल्हा रुग्णालयाच्या ढीसाळ कारभाराबाबत जाब विचारण्यात आला. पेशंट दगावल्यानंतर पोस्टमार्टम साहित्यसाठी उपजिल्हा रुग्णालयातून नातेवाईकांकडून पैसे घेतले जातात याबाबत रुग्ण कल्याण कमिटी मार्फत व्यवस्था करण्यात यावी अशी सूचना करण्यात आली. या चर्चेमध्ये उपजिल्हा रुग्णालयाचा सुरक्षारक्षकच पोस्टमार्टम चे काम व रुग्णवाहिकेची सेवा सुद्धा स्वतःच पुरवत असले चे निदर्शनात आले तसेच तो नातेवाईकांकडून वारे माप पैसे मागत असल्याचे निदर्शनात आले सदर सुरक्षारक्षकावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. या संदर्भात माननीय आमदार प्रकाश आबिटकर साहेब यांच्याकडे निवेदन देऊन उपजिल्हा रुग्णालयाच्या एकूण भोंगळ कारभाराबाबत बैठकीची मागणी करण्यात येणार आहे.
या चर्चेमध्ये गडहिंग्लज शिवसेना तालुकाप्रमुख संजय संकपाळ, शिवसेना शहर प्रमुख विजय थोरवत आजरा तालुका कृषी कमिटी अध्यक्ष इंद्रजीत देसाई, साळगाव सरपंच धनंजय पाटील, लाटगाव उपसरपंच रणजीत सर देसाई, संतोष भाटले, सुनील दिवेकर व मृताचे नातेवाईक व इतर मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.