🛑व्यंकटराव प्रशालेमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी
🛑दूरदृष्टी असणारा लोकराजा राजर्षी शाहू महाराज – सुनील सुतार. ( स्वामी विवेकानंद विद्यामंदिर आजरा.)
🛑प्रा तेजस पारपोलकर यांची सांख्यिकी अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल.- श्रीमंत गंगामाई वाचनालयाच्या वतीने सत्कार संपन्न. राजश्री शाहू जयंती साजरी.
आजरा :- प्रतिनिधी.

आजरा येथील व्यंकटराव हायस्कूल व जुनिअर कॉलेज,आजरा या प्रशालेमध्ये छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
आजरा महाल शिक्षण मंडळ आजराचे चेअरमन जयवंतराव शिंपी यांच्या शुभहस्ते शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे सेक्रेटरी एस .पी.कांबळे माजी प्राचार्य व संचालक सुनील देसाई, सर संचालक सुनील पाटील, सचिन शिंपी, अभिषेक शिंपी प्रशालेचे प्राचार्य आर.जी.कुंभार पर्यवेक्षिका सौ. व्ही.जे .शेलार सर्व शिक्षक- शिक्षिका, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. राजर्षी शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती निमित्त प्रशालेत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. प्रशालेतील सहाय्यक शिक्षक एस .वाय .भोये यांनी राजर्षी छ.शाहू महाराज यांचे सामाजिक व शैक्षणिक कार्य या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी मानवता समता, न्याय या मूल्यांचे संरक्षक व संवर्धक राजर्षी शाहू महाराज असे विवेचन आपल्या व्याख्यानातून केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.व्ही.पाटील यांनी केले, तर आभार एस. व्ही. पारळे यांनी मानले.
🛑दूरदृष्टी असणारा लोकराजा राजर्षी शाहू महाराज – सुनील सुतार. ( स्वामी विवेकानंद विद्यामंदिर आजरा.)
आजरा.- प्रतिनिधी.

‘शाहू राजा हा बहुजनांचा राजा असून सामाजिक क्रांतीसाठी झटणारा व दूरदृष्टी असणारा राजा होता.’ असे उद्गार मुख्याध्यापक सुनील सुतार यांनी काढले. शाहू जयंतीनिमित्त स्वामी विवेकानंद विद्यामंदिर आजरा शाळेत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्याध्यापक सुनील सुतार यांच्या हस्ते शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. कार्यक्रमप्रसंगी आराध्य मोरे, अथर्व कुंभार, विराज बेळगुंदकर, स्वरा शिंत्रे, दीप्ती सावंत, शौर्या चोथे, धारा रांगणेकर, प्रियल पोवार, अक्षरा पारपोलकर, अनघा कुलकर्णी, शांभवी पंडित, अन्विता कुरुणकर, दुर्वा भास्कर, क्षितिजा उपासे या विद्यार्थ्यांनी आपले महाराजांविषयीचे विचार भाषणांमधून व्यक्त केले. श्री सुतार सर यांनी शाहू महाराजांचा वसा, वारसा व आपण आणि राजांचे दूरगामी कार्य यावर विचार व्यक्त केले. कार्यक्रमास प्रेमा साठे, विजयालक्ष्मी देसाई, उत्तम नातलेकर, संयोगिता सुतार, राजाराम गाडीवड्ड या शिक्षकांसह विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रेमा साठे यांनी तर आभार राजाराम गाडीवड्ड यांनी मानले.
🛑प्रा तेजस पारपोलकर यांची सांख्यिकी अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल.- श्रीमंत गंगामाई वाचनालयाच्या वतीने सत्कार संपन्न.
आजरा.- प्रतिनिधी.

आजऱ्यातील श्रीमंत गंगामाई वाचन मंदिराचे सभासद व स्पर्धा परीक्षा विभागाचे अभ्यासक प्रा. तेजस गणपती पारपोलकर यांची सांख्यिकी अधिकारी, नियोजन विभाग दिल्ली व सांख्यिकी अन्वेशक, आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन या दोन पदांवर स्पर्धापरीक्षेव्दारे निवड झाल्याबद्दल वाचनालयाच्या वतीने शाल, ग्रंथभेट व पुष्पगुच्छ देऊन वाचनालयाचे अध्यक्ष डॉ अशोक बाचुळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
ग्रंथालयाचा स्पर्धा परीक्षा विभाग गेली १० वर्षे सुरू आहे. याठिकाणी अभ्यास करून अनेक विद्यार्थी शासनाच्या सेवेत रुजु झाले आहेत अशा गुणवंतांचा सत्कार करण्याची संधी वाचनालयाला वारंवार मिळत आहे याचा निश्चितच आनंद आहे असे प्रास्ताविकात विजय राजोपाध्ये यांनी सांगीतले.
आपल्या अभ्यासाचे योग्य नियोजन करून प्रयत्न करा यश नककी मिळेल, आपल्या यशात श्रीमंत गंगामाई वाचन मंदिराचे मोठे योगदान आहे असे प्रा. तेजस पारपोलकर यांनी मनोगतात सांगीतले. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या युवकांच्या पाठीशी श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर सदैव उभे राहील असे अध्यक्षीय मनोगतात डॉ अशोक बाचुळकर यांनी सागीतले. कार्यक्रमास उपाध्यक्षा गीता पोतदार, कार्यवाह सदाशिव मोरे, सहकार्यवाह विनायक आमणगी, संचालक संभाजी इंजल, सुभाष विभुते, वामन सामंत, रविंद्र हुक्केरी, महंमदअली मुजावर, बंडोपंत चव्हाण, ग्रंथपाल चंद्रकांत कोंडुसकर, निखील कळेकर, महादेव पाटील यासह स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी, नागरीक उपस्थित होते.
चौकट
शाहू जयंती कार्यक्रम
श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. ग्रंथालयाचे अध्यक्ष डॉ. अशोक बाचुळकर यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी शाहू महाराजांवरील ग्रंथालयातील पुस्तकांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते कार्यक्रमाला ग्रंथालयाचे कार्यवाह सदाशिव मोरे, संचालक संभाजी इंजल, रविंद्र हुक्केरी, महंमदअली मुजावर, ग्रंथपाल चंद्रकांत कोंडुसकर, महादेव पाटील, निखिल कळेकर यांसह वाचनालयाचे वाचक व विद्यार्थी उपस्थीत होते.