🛑व्यंकटराव प्रशालेत ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा
🛑देवर्डे विद्या मंदिर शाळेत जागतिक योग दिन साजरा.
🛑वटपौर्णिमा सण तालुक्यात उत्साहात साजरा.
आजरा :- प्रतिनिधी.

येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा या प्रशालेत २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रशालेचे प्राचार्य आर जी कुंभार सर पर्यवेक्षिका सौ व्ही. जे. शेलार मॅडम एनसीसी विभाग प्रमुख श्री एम एस पाटील यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षिका कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.
प्रशालेचे प्राचार्य श्री. कुंभार सर यांनी विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्व सांगितले. भारतीय संस्कृतीने योगा ही जगाला दिलेले देणगी आहे असे उद्गार त्यांनी यानिमित्ताने व्यक्त केले. तसेच क्रीडा शिक्षक एस.एम.पाटील यांनी योग दिनानिमित्त विद्यार्थ्यांना योगासनांचे प्रात्यक्षिक करून दाखविले. ओमकार मंत्र स्वर उच्चाराने प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांनी योगासनांच्या प्रात्यक्षिकाला सुरुवात केली. योगासनांमध्ये प्रामुख्याने वृक्षासन,पादहस्तासन,अर्धचक्रासन,त्रिकोणासन, ताडासन, पर्वतासन भुजंगासन या योगासनांसह प्राणायामाचे नाडी शोधन प्राणायाम,अनुलोम विलोम प्राणायाम ,भ्रमरी प्राणायाम, यांच्यासह विविध शारीरिक हालचाली, श्वसनाच्या विविध कृती विद्यार्थ्यांकडून करून घेतल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी .व्ही.पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन व्ही .एच.गवारी यांनी केले.
🛑देवर्डे विद्या मंदिर शाळेत जागतिक योग दिन साजरा.
आजरा.- प्रतिनिधी.

देवर्डे ता. आजरा येथील शाळेत जागतिक योग दिन विद्या मंदिर श्री.रवळनाथ हायस्कूल साजरा करण्यात आला. योगाची प्रात्यक्षिक शिक्षक राजेंद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या कडून करून घेतली यामध्ये पहिली ते दहावीचे विद्यार्थी सहभागी झाले गायत्री मंत्र ओमकार सह अलोन विलोम कपाल भारती प्राणायाम सुखासन पर्वतासन वज्रासन नौकासन चक्रासन ताडासन वृक्षासन या उपक्रमांमध्ये मुख्याध्यापक विनायक आमनगी सुभाष सावंत सुनील पाटील महादेव तेजम श्रीकांत पाटील सरोजिनी कुंभार रेश्मा बोलके चंद्रकांत घुरे देवेंद्र शिखरे महेश नावलगी या शिक्षकासह विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.
🛑वटपौर्णिमा सण आजरा तालुक्यात उत्साहात साजरा.
आजरा.- प्रतिनिधी.

सालाबाद प्रमाणे येणारा वटपौर्णिमा, ज्याला वट सावित्री पौर्णिमा किंवा वट पौर्णिमा असेही म्हटले जाते, हा भारतातील विवाहित महिलांनी साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा सण आहे. हा सण आजरा तालुक्यात उत्साहात साजरा केला जातो. विवाहित महिला आपल्या पतीच्या कल्याणासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करून सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत उपवास करतात..
यासह उत्तर भारतामध्ये ज्येष्ठ अमावस्येला वट सावित्रीचे व्रत सर्वत्र पाळले जाते. या विशेष दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते. याशिवाय असे मानले जाते की वटवृक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे त्रिमूर्ती वास्तव्य करतात, म्हणून त्याची पूजा केल्यास तिन्ही देवतांचे आशीर्वाद एकत्र येतात.
वट सावित्री पूजेच्या दिवशी, विवाहित स्त्रिया पहाटेपासून संध्याकाळपर्यंत उपवास करतात आणि वटवृक्षाभोवती धागे बांधणे, झाडाला पाणी, फळे आणि फुले अर्पण करणे आणि त्यांच्या पतीच्या कल्याणासाठी प्रार्थना करणे यासारखे विधी करतात. ग्रामीण भागात असे सण महिला अगदी उत्साहात साजरा करतात त्याप्रमाणे सालाबाद प्रमाणे आजरा तालुक्यात प्रत्येक गावात महिलांनी हात सण उत्साहात साजरा केला.
