आजरा बाजारात तोबा गर्दी.- नागरिकांनी शिथील लाँकडाऊनचा गैरफायदा टाळावा.- नगरपंचायतने गर्दीला निर्बंध लावणे गरजेचे.
आजरा. प्रतिनिधी. १४.
आजरा येथील बाजारपेठत आजरा शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांची प्रचंड गर्दी होताना दिसत आहे नागरिक शिथील केलेल्या लॉकडाऊनचा गैरफायदा घेत आहेत असेच म्हणावे लागेल. परंतु दुसरीकडे पेरणीची गडबड असताना बी-बियाणे खते खरेदीसाठी शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आजरा बाजारात येत असला तरीही आज दि. १४ रोजी बाजारपेठेत गर्दीने कहरच केला आहे. नागरिकांनी देखील प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे. कोरोणाचा वाढता पादुर्भाव लक्षात घेता स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे आहे. परंतु याचे भान नागरिकांना दिसत नसल्याचे चित्र आजरा शहरात पाहायला मिळत आहे. आजरा नगरपंचायत यांनी बाजारपेठेतील लहान-मोठी वाहने येण्या-जाण्याची मार्ग बंद करणे गरजेचे आहे. लहान वाहने बाजारातून फिरत असताना देखील मोठ्या प्रमाणात दिसत होती.
