Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रश्री. शिवराज्याभिषेक सोहळा./ आजऱ्यात हिंदू साम्राज्य दिन होणार उत्साहात साजरा..

श्री. शिवराज्याभिषेक सोहळा./ आजऱ्यात हिंदू साम्राज्य दिन होणार उत्साहात साजरा..

श्री. शिवराज्याभिषेक सोहळा./ आजऱ्यात हिंदू साम्राज्य दिन होणार उत्साहात साजरा..

आजरा.- प्रतिनिधी.

हिंदू पद पातशाहीचे तोरण चढे…

आजरा येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि आजरा सकल हिंदू समाजाच्या वतीने श्री शिवराज्याभिषेक सोहळा अर्थात हिंदू साम्राज्य दिन जेस्ट शुक्ल त्रयोदशी २० जून २०२४ रोजी भगव्या मय वातावरणात संपन्न होणार आहे.
हिंदवी स्वराज्याचे आद्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेकाला ३५० वर्ष पुर्ण होऊन ३५१ ये शिवशकाचे पर्व सुरू होत आहे. हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे श्री छत्रपती व उभारणीसाठी सर्वस्वाची बाजी लावणाऱ्या अठरा पगड जातींच्या मराठेशाहीच्या सर्व मर्द मावळ्यांना मानाचा मुजरा…
श्री शिवराज्याभिषेक विधी शास्त्रोत्क आणि मत्रोक्त पद्धतीने करण्यांत आला त्यावेळी महाराजांची तुला झाली राज्याभिषेक दालन हिंदू परंपरेनुसार ३२ शुभ चिन्हांनी सजवलेले होते. भव्य सिंहासन सभासद बखर म्हणते त्याप्रमाणे ३२ मन सोन्याचे (१४ लाख रूपये मुल्य असलेले) सिंहासन सोन्याच्या पत्र्याने मढवलेले होता श्रीशिवाजी महाराज सिंहासनावर आरूढ झाले. छत्रपती झाले सोळा सवाष्ण्यांनी त्यांना ओवाळले. ब्राम्हणांनी मोठ्या स्वरात मंत्रांचे उधारण केले. राजाना आशीर्वाद दिला राजेंनी त्यांना भेटवस्तू दिल्या. शिवराज की जय शिवराज की जय च्या घोषणा दिल्या सोन्या-चांदीचे फुले उधळली गेली. विविध तालवाद्य सुस्वाद यांच्या जयघोषात आसमंत भरून गेले. प्रत्येक गडावर ठरल्याप्रमाणे तोफा डागल्या गेल्या. मुख्य पुरोहित गागाभटांनी पुढे येऊन त्यांच्या डोक्यावर मोत्याची झालर ठवत राजा श्री शिवछत्रपती म्हणून सोळा प्रकारचे महादन त्यांनी केले. त्यानंतर विविध मंत्रीगणांनी सिंहासनापुढे जाऊन त्यांना अभिवादन केले छत्रपतींनी त्यांना याप्रसंगी विविध पद नियुक्तीपत्रे, धन, घोडे, हत्ती, रत्न, वस्त्र, शस्त्र, प्रदान केले. हे सर्व सकाळी आठपर्यंत संपले. समारंभ संपल्यावर पहिल्यांना एका देखण्या घोड्यावर स्वार होऊन जगदीश्वराच्या मंदिराकडे छत्रपती श्री शिवाजी महाराज गेले. तिकडून हत्तीवर स्वार होऊन त्यांची मिरवणूक श्रीमान रायगडावर नघाली. इतर दोन हत्ती जरीपटका आणि भगवे झेंडे घेऊन सेनेचे प्रतिनिधी होते. सोबत अष्टप्रधान भाणि इतर सैन्य होते. श्री रायगडावर ही मिरवणूक जात असताना सामान्य जनांनी फुले, चुरमुरे बधळले. दिवे ओवाळले. श्री रायगडावरील विविध मंदिराचे दर्शन घेऊन श्री महाराज महालात परतले. हिंदवी स्वराज्य वाढीसाठी आणि बळ मिळण्यासाठी महाराजांनी सहकार्याच्या सोबत गडावरील देव देवतांचे र्शन घेऊन आशीर्वाद मागितले राज्याभिषेक विधी संपन्न झाला. अगदी तसाच आशिर्वाद मागण्याची बदरणीय श्री संभाजीराव भिडे गुरूजी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आपल्या शिवतीर्थावर समित ब्धी झाल्यानंतर महाराजांची पालखीत मूर्ती ठेऊन देव दर्शन पदयात्रा काढतो ही यात्रा शहरा प्रसू र्गावरून देशासाठी, धर्मासाठी बलीदान दिलेल्या नरवीर मावळ्यांच्या सैन्यांच्या बाचा गजर करत पूर्ण करतो.
या श्री शिवराज्याभिषेक दिन अर्थात हिंदू साम्राज्य दिनाच्या कार्यक्रमासाठी सर्व बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

कार्यक्रमाची रूपरेषा. सकाळी ७ वा.- शिवमूर्ती अभिषेक व नित्य पूजन शिवतीर्थ आजरा
सकाळी.९ वा. साखर पेढे वाटप.
सकाळी ११.वा. देवदर्शन पदयात्रा प्रारंभ शिवतीर्थ मेन बाजारपेठ, महागाव रोड मार्गे वाणी गल्ली, सुतार गल्ली, सोमवार पेठ, गोठण गल्ली, दसरा माळ, बस स्टॅन्ड मेन बाजारपेठ कुंभार गल्ली रामदेव गल्ली व शिवतीर्थ येथे सांगता समारंभ होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.