राजू शेट्टींच्या आरोपाला आमदार सतेज पाटलांचं प्रत्युत्तर, – महाविकास आघाडीने राजू शेट्टी यांची कोणतीही फसवणूक केलेली नाही.
कोल्हापूर .- प्रतिनिधी.
महाविकास आघाडीने राजू शेट्टी यांची कोणतीही फसवणूक केलेली नाही. राजू शेट्टीनी आरोप केला का नाही मला माहित नाही मात्र मी पहिल्यापासून ते लोकसभा निवडणुकीत आमच्या सोबत यावेत यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत होतो. मात्र त्यांना महाविकास आघाडीमधून केवळ शिवसेनेचा पाठिंबा हवा होता काँग्रेस राष्ट्रवादीचा नको होता. त्यांची ही भूमिका शेवटला बदलली मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. त्यांनी लेखी स्वरूपात महाविकास आघाडीला पाठिंबा द्यावा अशी आमची अपेक्षा होती त्यासोबतच त्यांनी राज्यात देखील पाठिंबा द्यावा अशी आमची अपेक्षा होती. मात्र बुलढाणाबाबत त्यांच्या अडचणी होत्या त्यामुळे तिकीट फायनल झाल्यावर मी राज्यातील कार्यकारणीची भेट घेऊन निर्णय घेणार असे राजू शेट्टी म्हणाले होते. मात्र यात वेळ गेला आणि वरिष्ठ पातळीवर बरेच समज गैरसमज झाले. यामुळे निर्णय बदलला गेला असे प्रत्युत्तर आमदार सतेज पाटील यांनी राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीवर केलेल्या फसवणुकीच्या आरोपाला दिले आहे.
मुलाखत मधील मुद्दे
विधानसभा निवडणुकीआधी कोल्हापुरात वातावरण बिघडवायचं आहे का?
काँग्रेस नेते सतेज पाटील यांचा गंभीर आरोप
लोकसभा निवडणुकीआधी कोल्हापूरमध्ये दंगली घडवल्या होत्या
On शक्तीपीठ महामार्ग.
शक्तीपीठ महामार्ग संदर्भात भाजपने अद्याप भूमिका घेतलेली नाही,
महायुती मधील दोन घटक पक्षांनी आपली भूमिका स्पष्ठ केली आहे, पण भाजपाने अद्याप भूमिका जाहीर केली नाही.
महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट या दोन पक्षांना किती किंमत आहे हे कळतंय
कंत्राटदार धर्जीन शक्तीपीठ महामार्ग आहे.
उद्याचा मोर्चा मोठ्या शक्तीने होणार.
केंद्राने सूचना दिल्या आहेत , त्यामुळे महाराष्ट्र सरकार हा महामार्ग करण्याचा प्रयत्न करत आहे असं दिसतंय.
On शेट्टी.
लोकसभेला राजु शेट्टी आमच्याबरोबर यावेत यासाठी मी पहिल्या पासून करत होतो, त्यांना फक्त शिवसेनेचा पाठींबा हवा होता, पण बाकीच्या पक्षाशी ते बोलत न्हवते.
राजु शेट्टी याची कोणतीही फसवणूक झालेली नाही, मी शेवट पर्यंत ते सोबत यावेत यासाठी प्रयत्न करत होतो..
On जयंत पाटील.
सांगलीत जयंत पाटील आणि काँग्रेस नेत्यांमध्ये काही गैरसज आहेत, पण ते लवकरच मिटतील.
On जागावाटप.
नवीन टीम येणाऱ्या विधानसभेत दिसेल.
विधानसभे संदर्भात अद्याप कोणताही फार्मूला ठरलेला नाही, तो राज्य पातळीवर निर्णय घेतला जाईल
कोल्हापुरात काय फॉर्म्युला असेल हे देखील ठरलेला नाही
काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे माहाविकास आघाडीचा घटकपक्ष म्हणून एकत्रित ठरवतील.
On कळंबा कारागृह.
कोल्हापुरात कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे, अनेक प्रकरणं समोर येत आहेत.
पोलीस यंत्रणा राजकीय यंत्रणेत आडकले अस दिसतय.
जेल यंत्रणेमध्ये मोठ्या प्रमाणात बिघाड झाला आहे.
दर दोन दिवसाला एक खून कोल्हापुरात होत आहे, तर कळंबा कारागृहात दर दोन दिवसाला नवनवीन गोष्टी सापडत आहेत. याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.