कोल्हापूर – आजरा एस. प्रवास ..झाला पाच तासाचा – हकिगत प्रवाशांची.. ( एसटी पंचर.- मेकॅनिकल ड्युटी संपली .. कागल आगाराच्या कर्मचाऱ्यांचे कायद्यावर बोट. – सामाजिक बांधिलकी जपली नाही.)
आजरा – संभाजी जाधव.

ज्या प्रवाशांच्यावर आपली नोकरी असते त्यांचा थोडा तरी आदर त्या – त्या विभागातील कर्मचाऱ्यांनी करावा व सामाजिक बांधिलकी जपावी असा संदेश देणारी घटना बुधवार दि. १२ रोजी कोल्हापूर मधून ४ .२० दरम्यान सुटणारी कोल्हापूर आजरा एसटी क्रं. MH.BT.3371 या एसटी मधून प्रवास प्रवास करणारी प्रवासी आजरा मधील अंदाजे 8 तर अन्य जवळपास 50 प्रवासी हे कागल व निपाणी येथीलच नेहमीप्रमाणे होते. मुळात आजरा कोल्हापूर एस टी मध्ये आजऱ्याच्या प्रवाशांना बसायला जागाच नसते ते निपाणी व कागल येतलीच जास्त असल्याचा अनुभव आज तागायत आहे. कोल्हापूर पासून आजऱ्यापर्यंत एसटी येईपर्यंत जास्तीत जास्त दहा प्रवासी असतात. परंतु अन्य एसटी आजऱ्यावरून कोल्हापूरला जाताना अनेक वेळा एसटी थांबत नसते कारण त्यांचा स्टॉप नसतो. असे वेगवेगळे अनुभव येत असताना.. सदर कोल्हापूर वरून निघालेली एस.टी कागल आगरा नजीक आल्यानंतर पंचर असल्याचे वाहक चालकाच्या लक्षात आले व एसटी कागल आगारात वळवण्यात आली प्रवाशांना उतरून एसटी पंचर काढण्यासाठी गेली. लागलीच दहा मिनिटांपूर्वी सदर विभागातील कर्मचाऱ्यांची ड्युटी संपली होती. वाहक / चालक यांनी पंक्चर काढण्यासाठी नियमाप्रमाणे विनंती केली परंतु ड्युटी संपल्यामुळे नव्याने हजर होणारे कर्मचारी यांच्याकडून पंक्चर काढून घ्या. किंवा स्टेफनी बदलून घ्या. असे अपेक्षित उत्तर मिळालं. परंतु स्टेफनी बदलण्यासाठी केवळ कोणालाही पंधरा मिनिटे लागली असती परंतु असे न होता. आजरा आगाराच्या वाहक व चालकांनी प्रवाशांना मदत म्हणून सदर प्रवाशांना रस्त्यावर इतर एसटीना हात करत रस्त्याच्या बाजूला उभे करून कागल / निपाणी जशा एसटी बसेस भेटतील तसे प्रवाशांना पाठवण्यात आले शेवटी राहिले आजऱ्यातील प्रवासी. अंदाजे 4. 50 वा.. आगारात गेलेली एसटी अखेर कधी बाहेर आली कल्पना नाही परंतु कोल्हापूर / लाटगाव या एसटीमध्ये आजऱ्यातील प्रवाशांना मात्र उभे राहून प्रवास करावा लागला. परंतु कागल आगारातील कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपून पंधरा मिनिटांचा अधिक कालावधी ड्युटी मध्ये खर्च करून गाडीची स्टेफनी बदलून कर्मचाऱ्यांची सेवा करण्याची संधी नाकारली. रोज काही अशा घटना घडत नाहीत परंतु अचानक दुसऱ्या आगाराची आलेली एसटीची नादुरुस्त किंवा पंक्चर काढणे सेवा देणे वाटेत लागणारे आगाराची जबाबदारी असते याबाबत कागल आगाराची डेपो मॅनेजर ज्यांना देखील स्टेफनी बदलून देण्याची विनंती केली होती. पण कर्मचारी ड्युटी संपल्याने घरी गेल्यामुळे सदर डेपो मॅनेजर यांना अडचणी निर्माण झाली. व नवीन कर्मचारी आल्यानंतर काढून देण्यात येईल असे पर्याय नसल्यामुळे सांगण्यात आले. या घटनेमुळे कागल आगाराच्या दारात दोन तास प्रवाशांना ताटकळत बसावं लागलं. एसटीचा प्रवास सुखाचा प्रवास हे जरी खरं असलं तरी काही वेळा असे वेगळे अनुभव येतात.. नियमानुसार ड्युटी संपली होती. म्हणून प्रवाशांनी दोन तास ताटकळत रस्त्यावरती बसायचं का.? हा प्रश्न एसटी महामंडळाला प्रवाशांकडून होत आहे.. याचे उत्तर एसटी महामंडळाकडे आहे का.? आजऱ्यातील प्रवाशांना वाटते आजरा आगारात फक्त गोंधळ आहे. वेळेवर गाड्या नाहीत. आहेत त्या नादुरुस्त गाड्या असतात, मुंबई पुणे फेऱ्या तोट्यात जाऊन किलोमीटरसाठी असतात, स्थानिक लोकल फेऱ्या याकडे दुर्लक्ष असतं. किमान कोल्हापूर फेरी तरी तंदुरुस्त गाडीला द्यावी. अशीच परिस्थिती अनेक आगारात असल्याचे समजते. यावरती नियंत्रण कोणाचं आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कोल्हापूर की मुंबई… किलोमीटरसाठी आजरा आजाराच्या गाड्या पुणे मुंबईला फिरतात तोट्यात जाऊन.,.. हे कोणाच्या भल्यासाठी….. असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत लवकरच आजरा आगारावर जाब विचारणारे प्रवासी लवकरच जागे होणार आहेत.… व चाललेला सावळा गोंधळ उघड्यावर येणार आहे….
