Homeकोंकण - ठाणेलोकसभेच्या निकालानंतर ठाकरे-भाजपाचे मनोमिलन?( चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्यामुळे तर्कवितर्कांना उधाण! )🛑विनोद तावडे...

लोकसभेच्या निकालानंतर ठाकरे-भाजपाचे मनोमिलन?( चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्यामुळे तर्कवितर्कांना उधाण! )🛑विनोद तावडे काहीही झाले तरी मोठेच होतील.- भाजपात एकदा ठरलं की मुंगीलाही कळत नाही.- चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य.

🟥लोकसभेच्या निकालानंतर ठाकरे-भाजपाचे मनोमिलन?
( चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्यामुळे तर्कवितर्कांना उधाण! )
🛑विनोद तावडे काहीही झाले तरी मोठेच होतील.- भाजपात एकदा ठरलं की मुंगीलाही कळत नाही.- चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य.

मुंबई – प्रतिनिधी.

भाजपा नेते तथा राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं आहे. “उद्धव ठाकरे यांची प्रकृती बरी नसतानाही त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात महाराष्ट्रभर फिरून त्यांच्या गटाच्या नऊ जागा निवडून आणल्या”, असं म्हणत पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर स्तुतीसुमनं उधळली आहेत. पाटील म्हणाले, “उद्धव ठाकरे यांनी आमच्याबरोबरची (भारतीय जनता पार्टी) युती तोडली नसती तर राज्यात भाजपा आणि शिवसेनेने पुन्हा एकदा सर्वाधिक जागा जिंकल्या असत्या आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला घरी बसावं लागलं असतं. मात्र उद्धव ठाकरे यांनी युती तोडली. ते महाराष्ट्रभर फिरले आणि याचा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा झाला.”
🟥चंद्रकांत पाटील म्हणाले, “महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपाची युती असताना उद्धव ठाकरेंच्या पक्षाला राज्यात २३ जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी १८ जागांवर त्यांचे उमेदवार जिंकले होते. यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत सर्वात जास्त कष्ट कोणी घेतले असतील तर ते केवळ उद्धव ठाकरे यांनी घेतले. ते आमचे मित्र असल्यामुळे मला त्यांची काळजी वाटायची. कारण आपल्यापैकी अनेकांना आजारपणं असतात, तशी त्यांचीही काही आजारपणं आहेत. त्यावर मात करून ते महाराष्ट्रभर फिरले. या मेहनतीचं फळ म्हणून त्यांचे नऊ खासदार निवडून आले.
🛑राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, “२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने शिवसेना-भाजपा युतीच्या बाजूने कौल दिला होता. तेव्हा जर आमचं युतीचं सरकार आलं असतं तर आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांना घरी बसावं लागलं असतं. मात्र यावेळी त्यांचे १३ (काँग्रेस) आणि ८ (शरद पवार गट) खासदार निवडून आले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी या गोष्टीचं आत्मपरीक्षण करायला हवं. मी काही उद्धव ठाकरेंना सल्ला देणारा माणूस नाही. मात्र सध्याची परिस्थिती पाहता मला वाटतं की त्यांनी आत्मपरीक्षण करून पाहावं की या निवडणुकीतून किंवा युती तोडून त्यांनी काय मिळवलं? त्यांच्या हाती काय लागलं?”
🟥भाजपा नेते चंद्रकांत पाटील म्हणाले, “उद्धव ठाकरे यांच्या खासदारांवर अल्पसंख्यांकांच्या मतावर निवडून आलेले असा ठपका बसला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका नेत्याने फार चांगली पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं होतं की उद्धव ठाकरे यांचा हा भगवा विजय नसून हा हिरवा विजय आहे. तसेच त्यांच्या खासदारांची संख्या १८ वरून ९ झाली आहे. २०१९ प्रमाणे भाजपा आणि शिवेसना हे पक्ष एकत्र राहिले असते तर आज निवडणुकीच्या निकालाचं चित्र वेगळं असतं, तसेच त्यांच्या पक्षाची वाताहत झाली नसती. मात्र या सगळ्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने भरपूर फायदा करून घेतला.”

🛑विनोद तावडे काहीही झाले तरी मोठेच होतील.- भाजपात एकदा ठरलं की मुंगीलाही कळत नाही.-
चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य

कोल्हापूर : – प्रतिनिधी.

देशात भाजपाप्रणित रालोआ सरकार स्थापन झालं आहे. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनाही मंत्रीपद देण्यात आलं असून ते देशाचे आरोग्य मंत्री आहेत. त्यामुळे भाजपाकडून नवे अध्यक्ष निवडले जाणार हे स्पष्ट आहे. यासाठी विनोद तावडेंचं नाव चर्चेत आहे. विनोद तावडे हे सध्या भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी त्यांचं नाव चर्चेत आलं आहे. अशात चंद्रकांत पाटील यांनी एक महत्त्वाचं सूचक वक्तव्य केलं आहे.
🔴विनोद तावडे कर्तृत्ववान आहेत. त्यांना जिथे पाठवू तिथे यश कसं मिळेल याचे बारकावे ते शोधतात. १९९५ ला चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्र भाजपाचे सरसचिटणीस झाले. त्यानंतर चारच वर्षांत ते भाजपाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष झाले. अखिल भारतीय सरचिटणीस म्हणून दिल्लीला गेले. आता ते भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. पक्ष चालवण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. विनोद तावडेंना कुठली जबाबदारी द्यायची ते वरिष्ठ ठरवतील. एखाद्या व्यक्तीचा संबंधित पदावरचा कार्यकाळ संपल्यावर त्याला बदललं जातं. विनोद तावडेंबाबत अनेक पर्याय आहेत. असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
🟥भाजपात खूप माणसं आहेत, एखाद्या व्यक्तीचा संबंधित पदावरील कार्यकाळ संपल्यावर त्याला बदलले जाते. त्यामुळे विनोद तावडे यांच्याबाबत अनेक पर्याय चर्चेत आहेत. पण काहीही झालं तरीही विनोद तावडे मोठेच होतील आणि मला याचा खूप आनंद आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. विनोद तावडे यांना काय द्यायचे, हे केंद्र ठरवेल. भाजप पक्षाचं एक वैशिष्ट्य आहे की, आमचं ज्या स्तरावर ठरतं ती गोष्ट शेजारच्या मुंगीलासु्द्धा कळत नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्याचा नेमका अर्थ काय, याविषयी आता राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. कोल्हापूरमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं.
🔴लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीचा दारुण पराभव झाला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत २३ जागा जिंकणाऱ्या भाजपच्या खासदारांची संख्या थेट नऊपर्यंत खाली घसरली. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्यातील भाजपाचे पहिल्या क्रमांकाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून बाहेर पडून पक्षसंघटनेत काम करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. या सगळ्याविषयी भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे. भाजपा पक्षसंघटनेत नेत्याच्या इच्छेपेक्षा पक्षादेश महत्त्वाचा असतो. नेत्याने फक्त इच्छा व्यक्त करायची असते, आज्ञा करायची नाही. त्यामुळेच आम्ही टिकून आहोत. अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीसांनी थांबण्यास सांगितले आहे. त्यामुळे त्यांनी तो निर्णय मागे घेऊन पुन्हा कामाला सुरुवात केली आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.