Homeकोंकण - ठाणेपंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस सोडण्याचा.- एसटी महामंडळाचा निर्णय.‌

पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस सोडण्याचा.- एसटी महामंडळाचा निर्णय.‌

🟥पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस सोडण्याचा.- एसटी महामंडळाचा निर्णय.‌

मुंबई :- प्रतिनिधी.

पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी वारकरी दरवर्षी ‘विठू नामाचा जयघोष’ करीत श्री श्रेत्र पंढरपूरला जातात. या वारकऱ्यांच्या सोयीसाठी यात्राकाळात एसटी प्रवाशांसाठी पाच हजार विशेष जादा गाड्या सोडण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. विशेष म्हणजे यंदा राज्यातील कोणत्याही गावातून 40 अथवा त्या पेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी ग्रुप बुकींग केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी भाविक प्रवाशांनी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधावा असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.
🟥सालाबादप्रमाणे श्री श्रेत्र पंढरपुरला आषाढी एकादशीला राज्यभरातून लाखो वारकरी लाडक्या विठुरायाच्या दर्शनाला येतात. अनेक प्रवासी स्वत:च्या खाजगी वाहनाने, रेल्वेने, एसटीने अथवा विविध पालखीं बरोबर पायी चालत दिंडीने येत असतात. या प्रवाशांना एसटीने यंदापासून थेट गाव ते पंढरपूर अशी बस सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. 40 पेक्षा जास्त भाविकांची संख्या असल्यास त्यांना त्यांच्या गावापासून विशेष बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. अर्थात या प्रवासात देखील 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास देणारी ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजना’, महिलांसाठी 50 टक्के तिकीट दरात सुट देणारी ‘महिला सन्मान योजना’ यासारख्या सरकारच्या सवलत योजना लागू राहणार आहेत.
🅾️यात्रा काळामध्ये गर्दीचा फायदा घेऊन तिकीट न काढणे, वाहकांकडून तिकीट मागून न घेणे अशाप्रकारे फुकट प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना लगाम घालण्यासाठी एसटीने पंढरपूरला जाणाऱ्या विविध मार्गावर 12 ठिकाणी तपासणी नाके उभारण्याचे नियोजन केले आहे अशा फुकटया प्रवाशांचा अटकाव करण्यासाठी एसटीचे 200 सुरक्षा कर्मचारी आणि अधिकारी यात्रा काळात 24 तास नजर ठेवून असणार आहेत. एकादशीच्या दिवशी लाखो भाविक प्रवासी आपल्या गावाकडे मार्गस्थ होतात अशा वेळी रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊन प्रवासाचा खोळंबा होतो. यंदा स्थानिक पोलीस प्रशासनाच्या खांदयाला खांदा लावून 36 पेक्षा जास्त वाहतूक नियंत्रक आणि सुरक्षा रक्षक वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी काम करणार आहेत. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी एसटी पोलिस कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.