काश्मीरमध्ये भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ला.- 10 जणांचा मृत्यू.
जम्मू :- वृत्तसंस्था.
जम्मू आणि काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात रविवारी यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या गोळीबारानंतर बस एका खोल दरीत कोसळली असून हल्ल्यात बसमधील दहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
🟥वैष्णोदेवीपासून ८० किलोमीटर अंतरावर शिवखोरी हे धार्मिक स्थळ आहे. या भागात शंकर मंदिर असून देशभरातील भाविक या धार्मिक स्थळाला भेट देतात. रविवारी संध्याकाळी खासगी बसमधून काही भाविक देवदर्शन करून परतत होते. यादरम्यान दहशतवाद्यांनी हल्ला केला.