Homeकोंकण - ठाणेकिंगमेकर नितीश कुमार जेव्हा नरेंद्र मोदींच्या पाया पडतात! - व्हिडिओ वायरल!!

किंगमेकर नितीश कुमार जेव्हा नरेंद्र मोदींच्या पाया पडतात! – व्हिडिओ वायरल!!

किंगमेकर नितीश कुमार जेव्हा नरेंद्र मोदींच्या पाया पडतात! – व्हिडिओ वायरल!!

नवी दिल्ली – वृत्तसंस्था.

यंदाची लोकसभा निवडणूक अभूतपूर्व ठरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आले. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा सत्तेत येणारे नरेंद्र मोदी दुसरे ठरले. मात्र, यंदाच्या निवडणुकीत भाजपला स्वबळावर सत्ता मिळवता आली नाही.
🅾️दरम्यान, आज दिल्लीत एनडीएची संसदीय बैठक पार पडली. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकमताने NDA च्या नेतेपदी निवड करण्यात आली. एनडीएच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी जोरदार भाषण केले. त्यांनी पुन्हा एकदा नवनियुक्त खासदारांना विश्वास देण्याचा प्रयत्न केला.
🔴याचदरम्यान, एनडीएच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत भाषण झाल्यानंतर नितीश कुमार यांनी बसण्यासाठी जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पायाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. नितीश कुमार त्यांच्या पायाला हात लावण्यासाठी पुढे सरसावताच पंतप्रधान मोदींनी त्यांचे दोन्ही हात धरले आणि प्रेमाने हस्तांदोलन केले. काही वेळातच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री नितीश कुमार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा पाच महिन्यांनी लहान आहेत.
🟥दुसरीकडे, 2014 आणि 2019 मध्ये भाजपने स्वबळावर सत्ता स्थापन केली होती. यंदाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करेल असा विश्वास भाजपच्या नेत्यांना होता. मात्र भारतीय मतदारांनी भाजपला केवळ 240 जागापर्यंतच पोहोचवले. यामुळेच भाजपवर नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्याची वेळ आली. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू ‘किंगमेकर’ ठरले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.