🛑आर्थिक विकास महामंडळ मिळवून देण्यासाठी तळागातील ढोर (कक्कया )बांधवांचे आझाद मैदान येथे १८ जूनला राज्यव्यापी आंदोलन
🛑आंगवली विकास मंडळ मुंबई संचालित जनता विद्यालय आंगवलीचा दहावीचा निकाल १०० टक्के
मुंबई (शांताराम गुडेकर )
उठ कक्कया जागा हो, महामंडळाचा धागा हो…!वीरशैव कक्कया ढोर समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्याच्या हक्काचे आर्थिक विकास महामंडळ मिळवून देण्यासाठी तळागातील ढोर (कक्कया )बांधवाना आता एकजूट दाखवण्याची वेळ आली आहे. आपला समाज आजवर अनेक पक्षाचा दावणीला बांधला गेला.त्यांनी आपला स्वार्थ साधून घेतला.पण समाज मात्र मागे राहिला. या समाजाला योग्य दिशा देण्यासाठी,येणाऱ्या भावी पिढीचे भविष्य घडविण्यासाठी, आपापसातील मतभेद बाजूला सारून पावसाळी अधिवेशनात सरकारला घेराव घालण्यासाठी सज्ज होण्याची वेळ आली आहे.
येत्या १८जून २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता संत कक्कया स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाच्या मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्रातील सर्व कक्कया (ढोर )बांधव, भगिनी आणि समाज मंडळ तसेच त्यांचे कार्यकर्ते यांनी मोठया संख्येने आझाद मैदान येथे उपस्थित राहायचे आहे.
ढोर (कक्कया) समाजांच्या न्याय हक्कासाठी आजपर्यंत कुठल्याही सरकारकडून ढोर (कक्कया) समाजाला पुरेपूर न्याय मिळाला नाही आणि ढोर समाजाने सुद्धा कुठलेही आंदोलन करून आपल्या न्याय हक्कासाठी मागणी केली नाही.
पण आजची परिस्थिती आणि उद्याची चिंता व्यक्त करता (ढोर कक्कया )समाजाला अधिक अडचणीचा सामना करावा लागणार आहे.कारण उद्योग व्यवसायातून आणि शिक्षणातून आर्थिक बळ नसल्यामुळे हा समाज उद्योग व्यवसायातून वंचित होत चालला आहे.सरकारकडून दिवसेंदिवस जातीचे आरक्षण धोक्यात येत आहे.आपल्या समाज बांधवांना रिझर्वेशन चा धोका होणार आहे, त्यामुळे शैक्षणिकदृष्ट्या आणि व्यावसायिक दृष्ट्या समाज मोठ्या संख्येने मागे पडताना दिसणार आहे.
गेली पन्नास वर्षापासून असणारे लिड कॉम महामंडळ हे संत रोहिदास महामंडळ झाले आहे. पण त्याच्यावर कोणत्याही नेतेमंडळींनी ब्र शब्द केला नाही. या पन्नास वर्षात या महामंडळातून किती वाटा ढोर( कक्कया) समाजाला मिळाला याचे निदान केल्यावर असे कळाले की फक्त दोन टक्के सुद्धा नाही. याचा अर्थ काय?
आम्ही अतिशय श्रीमंत आहोत… की ,आम्ही अतिशय शूद्र आहोत. आम्हाला शासकीय आमच्या हक्काचे अनुदान मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे.या सर्व गोष्टींना वाचा फोडण्यासाठी,आज आम्हाला आमचे स्वतंत्र संत कक्कया आर्थिक विकास महामंडळ पाहिजे आहे आणि ते आपण मिळवल्या शिवाय शांत बसायचे नाही.एक दिवस समाजासाठी, समाजातील तरुण पिढीच्या भविष्यासाठी १८ जून २०२४ सकाळी १०.३० वाजता महाराष्ट्रातील तमाम ढोर (कक्कया )बांधवानी एकत्र येऊन आझाद मैदानात धरणे आंदोलन करुन संत कक्कया समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यास सरकारला भाग पाडू.उठ कक्कया जागा हो, महामंडळाचा धागा हो…!आता नाही तर कधीच नाही…! आम्ही सहभागी होत आहोत तुम्ही पण व्हा असे आवाहन श्री.दत्ता श्रावण खंदारे (धारावी)यांनी केले आहे.
आंगवली विकास मंडळ मुंबई संचालित जनता विद्यालय आंगवलीचा दहावीचा निकाल १०० टक्के
मुंबई (शांताराम गुडेकर )
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील देवरुख शहरापासून जवळच असलेल्या श्री क्षेत्र मार्लेश्वर परिसरातील मु. पो आंगवली गावातील शैक्षिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या आंगवली विकास मंडळ मुंबई संचालित जनता विद्यालय आंगवलीचा यंदाचा इयत्ता दहावीचा निकाल १०० % लागला असून या विद्यालयातील एकूण ४८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.यातील सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तमरीत्या पास होत शाळेला शंभर टक्के निकाल देत संस्थेचा तसेच या शाळेचा नाव उज्वल केले आहे. सन २०२३-२०२४ घेण्यात आलेल्या यंदाच्या एस. एस. सी. बोर्डाचा परीक्षेचा निकाल सोमवारी दि.२७ मे २०२४ रोजी दु.१ वा.सायबर कॅफे अथवा इंटरनेट मोबाईलवर माध्यमातून जाहीर झाला. या परीक्षेत जनता विद्यालय आंगवलीची यशस्वी परंपरा कायम राखत येथील विद्यार्थ्यांनी बाजी मारत शाळेचा शंभर टक्के निकाल दिला आहे .कु.भावेश महेंद्र पवार यांनी -८७. २० टक्के मिळवून प्रथम तर कु.भावेश प्रविण सुर्वे ८४. ८० टक्के गुण मिळवुन द्वितिय,कु.यश बबन जंगम यांनी ७६ टक्के गुण मिळवुन तृतीय क्रमांक पटकावला आहे.तसेच शाळेतील सर्व विद्यार्थिनी समाधान कारक गुण संपादित करत शाळेची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे.यामध्ये विशेष श्रेणी -०५, प्रथम श्रेणी -२०, द्वितिय श्रेणी -१९ तर पास श्रेणी -०३ चा समावेश आहे.तर उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे आंगवली विकास मंडळ मुंबई संचालित जनता विद्यालय आंगवली अध्यक्ष श्री.संतोष मोरेश्वर दळवी,आजी -माजी पदाधिकारी,विद्यमान उपाध्यक्ष, सचिव,खजिनदार,सल्लागार,सर्वं संचालक आणि प्रशाळेचे मुख्याध्यपक श्री. अजितकुमार रामचंद्र चव्हाण तसेच सर्व शिक्षक व शिक्षेकत्तर कर्मचारी वर्ग,संस्थेचे संचालक,सदस्य ,तसेच गावातील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील,आंगवली -सोनार वाडी ग्रामस्थ,मारळ, बामणोली, निवदे,बोंड्ये,कासार कोळवण,वांझोळे, निवे, हातीव ग्रामस्थ,नागरिक यांनी अभिनंदन करून या विद्यार्थ्यांस पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.