Homeकोंकण - ठाणेरत्नागिरी जिल्ह्यातील जि. प. शाळेतील २३ हजार विद्यार्थ्यांमधून २० जणांची ‘नासा’साठी निवड(...

रत्नागिरी जिल्ह्यातील जि. प. शाळेतील २३ हजार विद्यार्थ्यांमधून २० जणांची ‘नासा’साठी निवड( अभ्यासूपणा, गुणवंतपणा आयुष्यभर ठेवून उज्ज्वल करिअर करा. जिल्हाधिकारी एम. देवेंदर. सिंह )🟥रत्नागिरी जिल्ह्यात १० जूनपर्यंत मनाई आदेश जारी.

🟥रत्नागिरी जिल्ह्यातील जि. प. शाळेतील २३ हजार विद्यार्थ्यांमधून २० जणांची ‘नासा’साठी निवड
( अभ्यासूपणा, गुणवंतपणा आयुष्यभर ठेवून उज्ज्वल करिअर करा. जिल्हाधिकारी एम. देवेंदर. सिंह )
🟥रत्नागिरी जिल्ह्यात १० जूनपर्यंत मनाई आदेश जारी.

रत्नागिरी :- प्रतिनिधी.

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या 3 गुणवत्ता परीक्षेतून 23 हजार विद्यार्थ्यांमधून 20 विद्यार्थ्यांची ‘नासा’ ला जाण्यासाठी निवड करण्यात आली.आयुष्यभर हाच अभ्यासूपणा, गुणवंतपणा ठेवून, भविष्यात आयएएस,आयपीएस, एमपीएससी, डॉक्टर, इंजिनियर बनावे.पालकांनीही ती जबाबदारी स्वीकारावी, अशा शब्दात जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
🟥जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, डॉ. ज्योती यादव, शिक्षक वैभव थरवळ, समीक्षा मुळे, अभिजित भट आदींसह पालक उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी प्रत्येक विद्यार्थी आणि पालक यांच्याशी संवाद साधला.ते म्हणाले, चांगल्या प्रकारे शिक्षण घ्या. त्याचबरोबर चांगल्याप्रकारे मैदानावर विद्यार्थ्यांनी खेळावे.मी वयाच्या 25 व्या वर्षी प्रथम विमानात बसलो.
🅾️तुम्ही या लहान वयात विमानातून प्रवास करत आहात. तेही नासासाठी ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. 23 हजार विद्यार्थ्यांमधून तुमची निवड झाली, हा आदर्श ठेवून भविष्यात उज्ज्वल, यशस्वी करिअर घडवा. गुगल आणि ॲपल कंपनीलाही तुम्ही भेट देणार आहात.तेथील चांगल्या गोष्टी आत्मसात करा, असेही ते म्हणाले. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पुजार आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. यादव यांनी नासा अभ्यास सहलबाबत सविस्तर माहिती दिली. नासाला जिल्हा परिषदेच्या शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना घेऊन जाण्याचे हे दुसरे वर्ष आहे. या बरोबरच इस्रोला देखील यापूर्वी विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेमार्फत नेण्यात आले आहे.

🟥रत्नागिरी जिल्ह्यात १० जूनपर्यंत मनाई आदेश जारी.

रत्नागिरी :- प्रतिनिधी.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक लोकसभा मतदार संघ 46 रत्नागिरी -सिंधुदुर्ग व 32 रायगड – रत्नागिरी लोकसभा मतदार संघ सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी दि. 4 जून रोजी होणार आहे. निवडणुकीची मतमोजणी झाल्यानंतर विजयी उमेदवारांकडून मिरवणुकीचे आयोजन करण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दि. 27 मे ते 10 जून 24 वा. कालावधीत फौजदार प्रक्रिया संहिता कायदा 1973 चे कलम 144 नुसार मनाई आदेश लागू करण्यात आल्याचा आदेश अपर जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिला आहे.
🔺एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करणे, वर्तमान पत्रांमध्ये वारंवार एकमेकांविरुध्द टीका टिप्पणी करणे, सोशल मीडियावर एकमेकांविरोधात माहिती प्रसारीत करणे, राजकीय पक्षांमधील किरकोळ वादाचे/ आरोप प्रत्यारोपांचे एखाद्या घटनेत होवून, तणाव निर्माण होवून, त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही यासाठी हे आदेश लागू करण्यात आले आहेत. मतमोजणी शांततेत व व्यवस्थीतपणे पार पाडण्यासाठी सर्व परवानाधारकांना शस्त्र न बाळगणे व बरोबर घेवून न फिरणे यांस मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) नुसार कारवाई करण्यात येईल, असा इशाराही श्री. सूर्यवंशी यांनी दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.