सोहाळे रोडवर. गव्याच्या धडकेत एक जखमी. ( वन विभाग हद्दीत सोहळे रोड व आजरा – गडहिंग्लज महामार्गावर दुतर्फा तारेंचे कुंपण करण्याची मागणी.)
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा तालुक्यातील
सोहाळे फाटयाहून सोहाळे गावाकडे जात असताना दुचाकीसमोर गवा आडवा आल्याने विमल मारुती
दोरुगडे (वय ७०) व माजी सैनिक सुनील मारुती दोरुगडे (वय ४०) हे दोघेजण जखमी झाले. सदरची घटना शनिवारी (दि.२५)
सायंकाळी ७.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातामुळे
परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, आजरा-गडहिंग्लज राष्ट्रीय महामार्गावरून सोहाळे गावात जाणाऱ्या स्त्यावरुन माजी
सैनिक सुनील दोरुगडे हे आपल्या दुचाकीवरुन आई विमल यांना
घेवून जात होते. दरम्यान, ळेकरांच्या रांगी नावाच्या शेताजवळ दोरुगडे यांच्या दुचाकीच्या गव्यांचा कळप अचानक आडवा आला. कळपातील गवे रस्ता पार करत असतानाच त्यातील मागे
राहिलेल्या गव्याची दुचाकीला धडक झाली. धडक होताच
दुचाकीवरुन दोघेजणही रस्त्यावर पडले. यामध्ये सुनील यांना
हाताला किरकोळ दुखापत झाली असून विमल यांच्या डो
गंभीर दुखापत झाली आहे. जखमींवर आजरा ग्रामीण
रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन पढील उपचाराकरिता गडहिंग्लज येथे पाठविण्यात आले.
{ आजरा गडहिंग्लज महामार्ग, व सोहळे गावात जाणाऱ्या वन विभागाच्या हद्दीत नेहमी गव्या रेड्याचे हल्ले होत असल्याने रस्त्याच्या दुतर्फा वनविभागाने तारेचे कुंपण करावे. व आपले वन्य प्राणी आपण सांभाळावे असे मागणी नागरिकांच्याकडून होत आहे. }