संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील कार्यकर्ते विजय शास्त्री यांचे दुःखद निधन ; डॉ. स्नेहा पुरंदरे यांना पितृशोक
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : १०
ज्येष्ठ कोविड योद्धा, डॉ. स्नेहा राजेश पुरंदरे यांचे पिताश्री विजय काशिनाथ शास्त्री (८२) चेंबूर यांचे गोवा येथे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, स्नुषा, जावई व नातवंडे असा परिवार आहे. श्री. विजय शास्त्री यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत दिनू रणदिवे व अशोक पडबिद्री यांच्या समवेत कार्य केले आहे. संयुक्त महाराष्ट्र पत्रिका हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे मुखपत्र छपाई करून लोकांपर्यंत पत्रिका पोहोचविणे हे काम त्यांनी निष्ठेने केले. मुंबईच्या नागरी सुविधांसाठीही त्यांनी काम केले. शिवसेनेचे माजी महापौर डॉ हेमचंद्र गुप्ते ह्यांचे समवेत दादर व चेंबूर येथे सामाजिक कार्य त्यांनी केले. चेंबूर लायन्स क्लबचे ते अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांच्यासोबतही युवा वर्गासाठी त्यांनी भरीव कार्य केले. माजी शिक्षणमंत्री सुधीर जोशी ह्यांच्यासमवेत १२ वर्ष सीकेपी बँकेचे संचालक म्हणून ही त्यांनी उत्तमरीत्या जबाबदारी सांभाळली. ज्येष्ठ पत्रकार राजेश पुरंदरे हे विजय शास्त्री यांचे जावई आहेत.
