खाजगी रोझरी कोव्हिड काळजी सेंटर- रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ८७ % – गरीब रुग्णांना दिला जातो.- मदतीचा हात.- डॉ. रश्मी राऊत.
आजरा. प्रतिनिधी. दि.१०
आजरा येथील रोझरी कोव्हिड सेंटरमध्ये आयुर्वेदिक औषध, योगासन रुग्णांच्या जवळ राहून व वेगवेगळ्या तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेत व दानशूर लोकांचा मदतीचा हात अशा सर्व बाजूंनी रुग्णांना बरे करण्याचा व गरीब रुग्णांना मदतीचा हात या कोव्हिड सेंटरने दिला आहे. व अशा परिस्थितीत एक खाजगी कोव्हिड सेंटर रुग्णांना बरे करण्याचा एक वेगळा प्रयत्न या आजरा रोझरी कोव्हिड सेंटरमध्ये सुरू असल्याचे येथील रोझरी कोव्हिड सेंटर व्यवस्थापक आजरा तालुक्यातील सहभागी असलेले डॉक्टर व महसूल विभागाच्या वतीने सदर कोव्हिड सेंटर दि.१८ मे रोजी सुरू करण्यात आले होते. या कोव्हिड सेंटरला आज दि १० रोजी २४ दिवस पूर्ण झाले या २४ दिवसाचा आढावा पत्रकार बैठकीत देण्यात आला यावेळी डॉ. रश्मी राऊत (गाडगीळ ) बोलत होत्या स्वागत डॉ. गौतम नाईक यांनी केले. डॉ.सौ. राऊत पुढे म्हणाल्या या २४ दिवसांमध्ये १०३ रुग्ण उपचार घेत आहेत यामध्ये रिकवरी रेट ८७% तर ६७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. व बाहेरील हॉस्पिटलमध्ये रेफर केलेले १० रुग्ण यांची देखील या कोव्हिड सेंटरमधील डॉक्टर माहिती घेत असतात.
“फ्री ऑफ कॉस्ट” मध्ये सुरू असलेल्या या कोव्हिड सेंटरमध्ये शासन नियमानुसार बिले आकारले जातात तर ज्या रुग्णांची आर्थिक परिस्थिती नाही अशा रुग्णांना अल्पखर्चाने बरे करून पाठवले आहेत. तर मोफत जेवणाची व्यवस्था, दोन वेळा आयुर्वेदिक काढा, नियमित योगा, रुग्णांच्या जवळ जाऊन रुग्णांचे उपचार करणारे हे कोव्हिड सेंटर असुन खाजगी असले तरीही या ठिकाणी जादा दाराने कोणतेही बिल आकारले जात नाही. शासन नियमाचे पालन करत शासन दराने रुग्णांचे बिल आकारले जाते. सध्या याठिकाणी १२ वार्ड बॉय व सहा सिस्टर काम करत आहेत. काही दानशूर लोकांनी मदत मिळत आहे. त्यामध्ये वाघाची तालीम या मंडळाचे अध्यक्ष यांनी रुग्णांना काडा देण्यासाठी १२ थरमास, तर आयुर्वेदिक औषध व मास्क प्रवण देसाई, तर फ्री ऑफ कॉस्ट दिले तर डाँ. रमेश शहा मुंबई यांनी औषधे देऊन सहकार्य केले.
या ठिकाणी रुग्णांना ऑक्सिजन व्यवस्था केली जात असल्यामुळे सोबत इतर खर्च, कामगार वेतन या गोष्टींचा विचार करून योग्य दरात, एक सेवा म्हणून रोझरी कोव्हिड आजरा तालुक्यातील नागरिकांच्या सेवेसाठी नेहमी अग्रेसर असेल . शासकीय कोव्हिड सेंटरचे देखील एकमेकांना सहकार्य मिळत आहे. या सेंटरचा आजरा तालुक्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन ही असे शेवटी बोलताना सौ डॉ.राऊत यांनी केले. यावेळी डॉ. दिपक हाळमणकर, डॉ.सागर पालपोलकर, डॉ. बी.जी. पाटील सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होता. डॉ. इंद्रजीत देसाई यांनी आभार मानले.
【 आजरा रोझरी कोव्हिड सेंटरमधील सेवेत असणारे डॉ. बी. जी. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त एका गरीब डिस्चार्ज घेणाऱ्या रुग्णाला श्री पाटील यांनी बिल न घेता मोफत सोडले. अशीही सामाजिक बांधिलकी जपणारे कोव्हिड सेंटरचे म्हणून नाव पुढे येत आहे. तर येथे उपचार घेत असलेले मुरुडे येथील गोपाळ पाटील वय ३० हा रुग्ण आर्थिक परिस्थिती नाजुक असल्यामुळे कोव्हिड सेंटरमधील सर्व डॉक्टरांनी या रुग्णांवर मोफत उपचार करून सेवा दिली आहे.】
