🛑बारावीत सर्व विषयात १०० टक्के गुण मिळवून तनिषा बोरमणीकरने घडवला इतिहास!
🟥तर बारावीला १०० टक्के गुण मिळवणाऱ्या तनिषाने कशी केली होती परीक्षेची तयारी? पहा👇
🟥माझा नातू अभ्यासात लक्ष देईल अन् वाईट संगतीपासून दूर राहील. – आजोबांच्या गॅरंटीनंतर न्यायाधिश धनवडेंचा बिल्डरपुत्राला जामीन…
🅾️महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचा निकाल मंगळवारी जाहीर झाला आहे. देशभरातील अनेक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. या परिक्षेत महाराष्ट्रातील संभाजी नगरच्या एका विद्यार्थिनीने १०० टक्के गुण मिळवले आहे.संभाजी नगरच्या तनिषा बोरमणीकर या विद्यार्थिनीने हे यश मिळवले आहे.
🔴तनिषा ही छत्रपती संभाजीनगरच्या देवगिरी कॉलेजमध्ये शिकत होती. बारावीच्या परिक्षेत १०० टक्के गुण मिळवणारी तनिषा ही एकमेव मुलगी आहे. तनिषाला १०० टक्के गुण मिळाल्याने तिच्या कुटुंबियांना खूप आनंद झाला आहे. तनिषाच्या शाळेच्या शिक्षकांनी देखील तिचे खूप कौतुक केले आहे.तनिषाने बोलताना सांगितले की, मला खरं तर ९५ टक्के मिळतील, अशी आशा होती. परंतु १०० टक्के मिळाल्याने मला खूप आनंद होत आहे. मी वर्षभर अकाउंट्स या विषयाचा अभ्यास केला. त्या विषयावर जास्त भर दिला. शेवटच्या दोन महिन्यात मी बाकीच्या विषयांचा अभ्यास केला. माझ्या शिक्षकांनी माझी खूप साथ दिली. मी बुद्धिबळ खेळायची. त्यामुळे माझा अभ्यास बुडायचा. माझ्या शिक्षकांनी आणि कॉलेजने खूप सपोर्ट केला. मी खेळामुळे कॉलेजला जास्त जाऊ शकले नाही. पण शिक्षकांच्या सपोर्टने मी हे यश प्राप्त केलं आहे.तनिषाचा आवडता विषया कोणता असे तिला विचारण्यात आले होते. त्यावर ती म्हणाली की, अकंउट्स विषय माझा आवडता होता. त्यात मला ९५ मार्क्स मिळाले. मला ओसीएम, इकोनॉमिक्स आणि पाली या विषयात १०० मार्क्स मिळाले.
🅾️बारावीच्या परिक्षेत एकूण ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाच्या वर्षी राज्यात मुलींनी बाजी मारली आहे. या वर्षी १४ लाख २३ हजार ९७० विद्यार्थ्यांनी बारावीची परिक्षा दिली होती. त्यापैकी एकूण १३ लाख २९ हजार ६८४ विद्यार्थी पास झाले आहेत. यावर्षी एकूण ९१.६० टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. राज्यात कोकण विभागात ९७.५१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.
🟥माझा नातू अभ्यासात लक्ष देईल अन् वाईट संगतीपासून दूर राहील. – आजोबांच्या गॅरंटीनंतर न्यायाधिश धनवडेंचा बिल्डरपुत्राला जामीन
पुणे :- प्रतिनिधी.

पुण्यातील कल्याणीनगर परिसरात एका बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलानं आपल्या पोर्शे कारनं दोघांचा बळी घेतल्याती घटना नुकतीच घडली आहे.याच हिट अँड रन प्रकरणी दिवसागणिक नवनवे खुलासे होत आहेत. तसेच, याप्रकरणी पुणे पोलीस आणि न्यायालयानं घेतलेल्या भूमिकेमुले केवळ पुण्यातच नाहीतर संपूर्ण देशभरात रोष निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे.
🟥याप्रकरणात अपघातानंतर अवघ्या 15 तासांतच आरोपी अल्पवयीन मुलगा जामीनावर बाहेर आला. पण न्यायाधीशांनी नेमका कशाच्या आधारावर जामीन दिला? असा सवाल उपस्थित करण्यात आला. समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी वेदांत अग्रवालचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल यांनी कोर्टात माझा नातू वाईट संगतीपासून दूर राहील आणि अभ्यासावर लक्ष केंद्रीय करेल, अशी हमी दिल्यानं जामीन मंजूर करण्यात आल्याचं समोर आलं आहे.आपल्या पोर्शे कारनं दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन आरोपी मुलाला देण्यात आलेला जामीन आणि त्याला न्यायालयाकडून सुनावण्यात आलेल्या शिक्षेचीही जोरदार चर्चा झाली. पण हा जामीन न्यायाधीशांनी नेमका कोणत्या तरतुदींच्या आधारावर मंजूर केला, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
🔴आपल्या महागड्या कारनं दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन आरोपी मुलाला पुणे पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर पुणे पोलिसांनी अल्पवयीन आरोपी अल्पवयीन आरोपीला न्यायालयात हजर केलं गेलं. न्यायाधिश धनवडे यांच्यासमोर त्याला हजर करण्यात आलं. यावेळी वेदातंचे वकील प्रशांत पाटील यांनी घडलेली घटना दुर्दैवी असली तरी जी कलमं लावण्यात आली आहेत, त्यामध्ये आरोपीला जामीन मिळण्याची तरतूद असल्याचं सांगितलं. न्यायालयानं ही बाब तात्काळ मान्य करुन अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर केला. यातील अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे, अल्पवयीन आरोपी वेदांत अग्रवाल अपघातावेळी दारू प्यायल्याचं प्रथमदर्शनी दिसत असूनही पोलिसांनी याबाबतचा रिपोर्ट अद्याप आला नसल्याचं कारण देत, आरोपीनं दारू प्यायल्याची बाब पोलिसांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलीच नाही.तसेच पुणे अपघातातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे, या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर करताना न्यायालयानं घातलेल्या अटी. या अटी अत्यंत आश्चर्यकारक होत्या. यावरुन संपूर्ण देशभरातून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
🛑अल्पवयीन आरोपीला कोणत्या अटींच्या आधारावर जामीन मंजूर करण्यात आला?
🟥बेदरकारपणे कार चालवून दोघांच्या मृत्युला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर करताना न्यायालयानं घातलेल्या अटी अतिशय आश्चर्यचकारक आहेत.
🔺1) अल्पवयीन आरोपी पुराव्यांशी छेडछाड करणार नाही, पळून जाणार नाही, अशी वकीलांनी हमी दिली.
🔺2) अल्पवयीन आरोपीच्या आजोबांनी माझ्या नातवाला वाईट संगतीपासून दूर ठेवण्याची हमी दिली आहे.
🔺3) आरोपी अभ्यासावर लक्ष केंद्रीय करेल, अशी हमीदेखील आरोपीच्या आजोबांनी दिलीय.
🔺4) अल्पवयीन आरोपीला पंधरा दिवस ट्रॅफिक कॉन्सटेबलसोबत चौकात उभं राहून वाहतुकीचं नियोजन करावं लागणार आहे.
🔺5) अल्पवयीन आरोपीला मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार घ्यावे लागणार आहेत.
🔺6) अल्पवयीन आरोपीला भविष्यात अपघात झाल्याचं दिसल्यास त्याला अपघातग्रस्तांना मदत करावी लागेल.
🔴अल्पवयीन आरोपी हा दारू प्यायल्याचं सिद्ध झाल्यास त्याला दारू देणारा बार मालक आणि अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांच्यावर कारवाई करू, असं पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटलं होतं. पण पुणे पोलिसांनी वेदांत दारू प्यायल्याचं न्यायालयाच्या आधीच निदर्शनास आणून दिलं नाही. ज्यामुळे वेदांतला जामीन मिळण्यास मदत झाली आणि दोघांना आपल्या गाडीखाली चिरडूनही अल्पवयीन आरोपी अगदी सहज जामीनावर सुटला.
🟥अल्पवयीन आरोपीवर दाखल गुन्हात नवं कलम वाढवलं
पुण्यातील कल्याणी नगरमधील अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलावर दाखल गुन्ह्यात पोलीसांनी 185 कलम वाढवलं आहे. या मुलाला पुन्हा ज्युवीनाईल कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे. दारु पिऊन कार चालवल्याबद्दल या अल्पवयीन आरोपीवर 185 कलमाच्या अंतर्गत नव्यानं गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याआधी त्याच्यावर कलम 304 अंतर्गत सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, अल्पवयीन असल्याच्या कारणावरून न्यायालयानं त्याला जामीन मंजूर केला होता.