महावितरण आजरा उपविभाग अंतर्गत 11 kV एम ई आर सी MERC चे भादवण फीडर – खेडे मध्ये बिलिंग कशाप्रकारे होते याबद्दलचे शिबिर संपन्न.
आजरा.- प्रतिनिधी.
महावितरण आजरा उपविभाग अंतर्गत 11 kV एम ई आर सी MERC चे भादवण फीडर वरील खेडे या गावांमध्ये बिलिंग कशाप्रकारे होते याबद्दलचे शिबिर आयोजित करण्यात आले.
सदरील शिबिरामध्ये इंडेक्स बिलिंग Index Billing काय आहे , कमी वापर करणाऱ्या ग्राहकांमध्ये जो असंतोष होता त्या अडचणीवर महावितरण कंपनीने MERC च्या परवानगीने ग्राहकांना स्वतःची रीडिंग टाकण्याची नवीन कार्यप्रणाली निर्माण केली त्या कार्यप्रणालीमध्ये रीडिंगच्या उपलब्धते साठी करावयाची कार्यवाही व त्याबाबत ग्राहकांचे शंका निरसन याबद्दल साधक बाधक चर्चा झाली.
याप्रसंगी ग्राहकांनीही बरेच वेगवेगळे प्रश्न विचारून आपल्या शंकाचे समाधान करुन घेतलें.सदरील मार्गदर्शना साठी सरपंच यांनी ग्रामपंचायतीमध्ये व्यवस्था केली होती त्या मार्गदर्शनास उपकार्यकारी अभियंता सुहास मिसाळ , शाखा अभियंता शरद पाटील, सहाय्यक लेखापाल इम्रान अत्तारवाले व पीसी होल्डर श्रवण कांबळे यांनी मार्गदर्शन केले . यावेळी शंकाचे बऱ्यापैकी समाधान झाल्याने सरपंचांनी महावितरणचे व उपस्थित शिबिरास आलेल्या सर्व शेतीपंपाच्या ग्राहकाचे आभार मानून शिबिराची सांगता केली .
अशी माहिती अभि सुहास मिसाळ,उपकार्यकारी अभियंता,
महावितरण, आजरा. यांनी दिली.