🛑साखर उत्पादकांसाठी आनंदाची बातमी.- इथेनॉल निर्मितीला केंद्र सरकारकडून परवानगी.
🛑आजरातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर - जागतिक हिवताप दिनानिमित्त हिवतापा संदर्भात जनजागृती.
नवी दिल्ली वृत्तसंस्था
साखर उत्पादकांसाठी आनंदाची बातमी आहे. शिल्लक बी हेवी मळीपासून इथेनॉल निर्मितीला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. ६ डिसेंबर २०२३ रोजी केंद्र सरकारने बी मळीपासून तयार होणाऱ्या इथेनॉल निर्मितीला बंदी घातली होती. पण सरकारनं आता ही बंदी उठवली आहे. त्यामुळे कारखानदारांसह शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
🟥केंद्र सरकारच्या या निर्णयामुळं बी हेवीच्या शिल्लक साठ्यांमध्ये अडकलेली ७०० कोटी रुपयांची रक्कम खुली होण्यास मदत होणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळं तब्बल ३८ कोटी लिटरची निर्मिती वाढणार असल्याची माहिती मिळतेय. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळं इथेनॉल निर्मितीला मोठी चालना मिळणार आहे. सरकारने देशांतर्गत साखरेच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी तसंच साखरेचा पुरेसा पुरवठा राहावा म्हणून हा निर्णय घेतला होता. साखर नियंत्रण कायदा १९६६ च्या कलम ४ आणि ५ नुसार इथेनॉल निर्मितीवर बंदी घालण्यात आली होती.
🔴अन्न पुरवठा मंत्रालयाने ७ डिसेंबर २०२३ रोजी दिलेल्या आदेशात ‘साखरेचा रस आणि सिरप’ पासून इथेनॉल बनवण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्र राज्यातील १५० इथेनॉल प्रकल्पांना थेट फटका बसला होता. केंद्राच्या या निर्णयामुळे साखर कारखान्यांबरोबरच ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यातील दिडशे साखर कारखान्यांमध्ये इथेनॉल निर्मिती केली जाते. या प्रकल्पामधून यावर्षी तयार होणाऱ्या सुमारे आठशे कोटी लिटर इथेनॉलचे पेट्रोलियम कंपन्यांची करार देखील झाले होते. केंद्र सरकारने निर्मितीवर बंदी घातल्याने साखर कारखान्याना मोठा धक्का बसला होता.
आजरातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर - जागतिक हिवताप दिनानिमित्त हिवतापा संदर्भात जनजागृती.
आजरा.- प्रतिनिधी.

प्राथमिक आरोग्य केंद्र वाटंगी अंतर्गत दि २५ एप्रिल रोजी जागतिक हिवताप दिनानिमित्त हिवतापा संदर्भात जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले प्राथमिक आरोग्य केंद्र वाटंगी अंतर्गत पोळगाव, कासार कांडगाव, गवसे, पारेवाडी, दाभित व शिरसंगी या आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये जनजागृती करण्यात आली यामध्ये रॅली काढणे, गप्पी मासे, सोडणे, गट सभा इत्यादी विविध कार्यक्रम साजरी करण्यात आले या कार्यक्रमासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. आर जी गुरव यांचे मार्गदर्शनाखाली आरोग्य सहाय्यक श्री साब खानआरोग्य निरीक्षक अतुल पाथरवट समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर सावंत श्री गदळे सेवक, प्रशांत चौधरी रोहित शेंडे घोरपडे आणि प्रमोद कांबळे यांनी विशेष परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.