कोरो इंडिया मुंबई स्वयंसेवी संस्थेकडून.- जीवनावश्यक वस्तूंचे असंघटित कामगारांना वाटप.
आजरा. प्रतिनिधी. दि.७
आजरा येथील पेरणोली, आजरा, सोहाळे येथे कोरो इंडिया मुंबई स्वयंसेवी संस्थेकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. कोव्हिडं १९ आणि त्यानंतर शासनाने लॉकडाऊनच्या घेतलेल्या निर्णयामुळे दलित, आदिवासी, श्रमिक, कष्टकरी, अल्पसंख्यांक जातवर्गातून आलेल्या असंघटित कामगार स्त्री पुरुषांवर उपासमारीची वेळ आली. अशा वेळी या त्यांना खरी मदतीची गरज असते. ही गरज ओळखून कोरो इंडिया मुंबई या सेवाभावी संस्थेच्यावतीने येथील स्वयंसेवी त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून या कठीण काळात आधार देण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रतील अनेक विभागातील गरजू लोकांची माहिती संकलित करून त्यांना मदत देण्याची प्रक्रिया सुरू केली. आजरा तालुक्यातील अशा गरजू लोकांची माहिती कॉम्रेड संपत देसाई यांनी दिल्यानंतर आज तालुक्यातील शंभर लोकाना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप आज तालुका पंचायत समितीचे अध्यक्ष उदयराज पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि आजरा पोलीस स्टेशनचे निरीक्षक बालाजी भांगे यांच्या हस्ते करण्यात आले. तांदूळ, तेल डाळ, साखर यासह प्रत्येकी दोन हजार किमतीच्या जीवनावश्यक वस्तूंचे एक किट असे साहित्य पेरणोली, आजरा, सोहाळे या गावात देण्यात आले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तानाजी देसाई, पत्रकार रणजित कालेकर,तसेच पोलीस पाटील दिपाली कांबळे, कृष्णा सावंत, राजाराम देसाई, नामदेव कुकडे, निवृत्ती फगरे यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते.
