( लहान तोंडी मोठा घास.) राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे खरे जनक वारसदार समरजीत घाटगे :- वीरेंद्र मंडलिक
कागल. – प्रतिनिधी.
छत्रपती कुटुंबाने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाला साजेसं काम केलेले नाही. ते काम जनक घराणे म्हणून विक्रमसिंह घाटगे आणि समरजित घाटगे यांनी केलं आहे. छत्रपती कुटुंबाने राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने एकही उद्योग काढलेला नाही. १२ ते १५ वर्षांपासून बंद पडलेली शाहू मिल देखील त्यांना सुरू करता आले नाही. अशी टीका महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचे सुपुत्र वीरेंद्र मंडलिक यांनी केली. ते काल कागल येथे आयोजित केलेल्या भाजप पदाधिकारी मेळाव्यात बोलत होते.
या कोल्हापूरमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे आपल्या सर्वांसाठी दैवत आहेत. त्यांचे जनक घराणे म्हणून आम्ही समरजीत घाटगे यांच्याकडे पाहतो. छत्रपती घराण्याने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाला साजेसे असे काम केलेले नाही. ती कामे समरजीत घाटगे आणि स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांनी मात्र केली आहेत. विक्रम सिंह घाटगे यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे केवळ वाचन केले नाही तर त्यांच्या आयुष्या मध्ये त्यांनी त्यांची मूल मंत्र जपली.
छत्रपती घराण्यातील त्यांचा एक उद्योग दाखवा, ज्याचे नाव त्यांनी शाहू ठेवले आहे. उलट शाहू मिल बंद पडून १२ ते १५ वर्षे झाली. ती मिल त्यांना अद्याप सुरू करता आली नाही. उलट समरजीत घाटगे हे शाहू साखर कारखाना चांगल्या पद्धतीने चालवत आहेत आणि त्याचे आदर्श आमच्यासारखे कारखानदार घेतात. म्हणून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे खरे जनक वारसदार समरजीत घाटगे तुम्ही आहात असे वीरेंद्र मंडलिक म्हणाले.