पुणे :- प्रतिनिधी.
राज्यासह देशातील हवामानात मोठे बदल होत आहेत. राज्यात काही ठिकाणी पारा 40 अंशांच्या वर गेला आहे. तर काही ठिकाणी मेघगर्जानेसह अवकाळी पाऊस पडत आहे. राज्यात अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे.आता देशातील काही भागासाह राज्यातही उष्णतेच्या लाटेचा अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात आता तापमानात मोठी वाढ होत असून आणखी आठवडाभर वातावरण आणखी तापण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
राज्यात पुढील 24 तासांसाठी विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता आहे. तसेच काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई आणि कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर कोकणाला उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसापासून मुंबई आणि ठाण्यात तापमानात प्रंचड वाढ झाली आहे. उष्णतेने अंगाची लाहीलाही होत आहे. तर वाढत्या उन्हामुळे अंगातून घामाच्या धारा निघत आहेत. पुढाल 24 तासांसाठी ठाणे, मुंबई, रायगडसाठी उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
🟥पुढील 24 तासात उन्हाचा तडाखा आणखी वाढणार असून नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच कोकण, ठाणे, मुंबई येथे तापमानाचा पार 40 अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे. तर काही जिल्ह्यात तापमान 40 अंशांच्या वर जाणार आहे. मुंहई, कोकण, ठाणे आणि मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.तर विदर्भ आणि मराठवाड्यात हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
🔴विदर्भातील पाच लोकसभांमध्ये प्रचाराच्या तोफा थंडावल्या.- आता छुपा प्रचार सुरू. – 19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यासाठी मतदान.
विदर्भ.- प्रतिनिधी.
🟣राज्यातील पहिल्या टप्प्यासाठी येत्या 19 एप्रिल रोजी मतदान होणार असून विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघातील प्रचारतोफा थंडावल्या आहेत. नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, रामटेक आणि भंडारा गोंदिया या मतदारसंघांमध्ये प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून आता छुपा प्रचार सुरू झाल्याचं दिसतंय.
🟥विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघात 19 एप्रिल 2024 ला पहिल्या टप्प्यासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. 17 एप्रिल ला भंडारा-गोंदिया लोकसभेतील अर्जुनी मोरगाव विधानसभा आणि गडचिरोली-चिमूर लोकसभेतील देवरी-आमगाव विधानसभा क्षेत्रात दुपारी तीन वाजता प्रचारतोफा थंडावल्या आहेत. तर गोंदिया आणि तिरोडा या दोन विधानसभा क्षेत्रामध्ये सायंकाळी 6 वाजता प्रचारतोफा थंडावल्या.
🔴19 एप्रिलला होणाऱ्या निवडणुकीसाठी मागील 17 दिवसांपासून प्रचार सुरू होता. या प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी सहा वाजता थंडावल्यात. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत पडोळे तर महायुतीच्या वतीने सुनील मेंढे हे एकमेकांसमोर उभे आहेत. या दोन्ही उमेदवारांसह सर्वच उमेदवारांनी आज शेवटच्या दिवशी मोठं शक्तीप्रदर्शन करीत रॅली काढल्या. त्यानंतर त्यांच्या प्रचारतोफा 6 वाजता थंडावल्या असून आता उमेदवाराकडून भेटीगाठी वर भर दिला जाणार आहे.
🔴अशा असतील विदर्भातील लढती
🔺रामटेक –
राजू पारवे शिंदे गट वि. श्यामकुमार बर्वे काँग्रेस.
🔺नागपूर –
नितीन गडकरी भाजप वि. विकास ठाकरे काँग्रेस
🛑भंडारा गोंदिया –
सुनील मेंढे भाजप वि. प्रशांत पडोळे काँग्रेस

🔺गडचिरोली-चिमूर .-
अशोक नेते भाजप वि. नामदेव किरसान काँग्रेस
🔺चंद्रपूर .- सुधीर मुनगंटीवार भाजप, वि. प्रतिभा धानोरकर काँग्रेस
🔺नागपुरात नितीन गडकरी वि. विकास ठाकरे
🟥नागपूर लोकसभेमध्ये भाजपचे नितीन गडकरी यांच्याविरोधात काँग्रेसने विकास ठाकरे अशी लढत होणार आहे. गतवेळच्या तुलनेत यंदा काँग्रेसचे सर्व नेते एकवटले असल्याचं दिसतंय. त्यामुळे नितीन गडकरी यांच्यासमोर यंदा मोठं आव्हान असल्याचं बोललं जातंय.
दुसरीकडे रामटेकची लढतही यावेळी लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे. रामटेकची जागा शिवसेनेकडून काँग्रेसकडे आल्यानंतर या ठिकाणाहून रश्मी बर्वे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण त्यांचं जात प्रमाणपत्र अवैध असल्याचं सांगत निवडणूक आयोगाने त्यांचा अर्ज रद्द केला. त्यामुळे त्यांचे पती श्यामकुमार बर्वे हे काँग्रेसचे उमेदवार असतील. तर दुसरीकडे शिंदे गटाने काँग्रेसचे नेते राजू पारवे यांना पक्षात घेऊन त्यांना उमेदवारी दिली. राजू पारवे यांना शिंदे गटात घेऊन उमेदवारी देण्यामध्ये भाजपच्या देवेंद्र फडणवीसांनी मोठी भूमिका निभावल्याचं दिसलं.
🛑दुबईत पावसाचे थैमान.- शाळा बंद, विमानतळ बंद,कार गेल्या वाहून.- दुबई झाली तुंबई, वाळवंटात आला पूर!
🔴आंतरराष्ट्रीय विमानतळ पाण्यात. – वाहतूक विस्कळीत.
🟥वर्षभरातील पाऊस झाला एकाच दिवसात
तर दुबईतील पुराच्या परिस्थितीचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर झाले व्हायरल
दुबई :- वृतसंस्था
पश्चिम आशियातील देश युनायटेड अरब अमिराती हा वाळवंटी देश म्हणून ओळखला जातो. पण, सध्या या देशात पावसाने हाहाकार माजवला आहे असंच म्हणावं लागेल. अनेक भागात पुराची स्थिती निर्माण झाली आहे.पावसाचा सर्वात मोठा फटका दुबईला बसला आहे. दुबईला येणारी अनेक विमाने दुसरीकडे वळवण्यात आली आहेत.
🛑दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात पाणी शिरलं आहे. त्यामुळे अनेक फ्लाईट काही काळासाठी थांबवण्यात आल्या आहेत. भारतातून दुबईला जाणाऱ्या फ्लाईटना देखील याचा फटका
बसला असल्याचं कळतंय. शाळा बंद करण्यात आल्या आहेत. शिवाय वाहतूक बंद झाली आहे.
🔴दुबई विमानतळ हे जगातील सर्वाधिक व्यस्त विमानतळापैकी एक आहे. त्यामुळे अनेकांना याचा त्रास सहन करावा लागला आहे. १६ एप्रिलच्या अनेक फ्लाईट उशिरा धावत आहेत किंवा रद्द करण्यात आल्या आहेत. भारत, पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि अमेरिकेला जाणाऱ्या फ्लाईटना याचा मोठा फटका बसला आहे. दुबईतील पुराच्या परिस्थितीचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
🟥दुबईमध्ये मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे पूर आला आहे. रस्ते, वाहने पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे वाहतूक बंद झाली आहे. अनेक लोकांना आपली वाहने आहे तेथेच सोडावी लागली आहेत. दुबईतील पाऊस पाहून अनेकांना मुंबईची आठवण झाली आहे. कारण, मुसळधार पाऊस पडल्यानंतर मुंबईमध्ये देखील अशीच परिस्थिती निर्माण होती. मुंबई झाली तुंबई असं आपण म्हणतो पण सध्या मुंबईची झाली तुंबई असं आपल्याला म्हणता येईल.
🅾️शेजारच्या ओमानमध्ये मुसळधार पावसामुळे आलेल्या मोठ्या पुरात मृतांची संख्या १८ वर पोहोचली आहे आणि इतर अजूनही अनेक लोक बेपत्ता आहेत, असे देशाच्या आपत्कालीन व्यवस्थापन समितीच्या राष्ट्रीय समितीने मंगळवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. ज्यात एका प्रौढ व्यक्तीसह वाहनात सुमारे १० शाळकरी मुले वाहून गेल्याचा देखील समावेश आहे, या नैसर्गिक त्रासदीवर ओमानच्या राज्यकर्त्यांकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे. ओमानसह बहारीन, कतार आणि सौदी अरेबियातही मुसळधार पाऊस पडला आहे.
