गोठ्यातील शेळीवर बिबट्याने केला हल्ला हल्यात शेळी ठार.- घटना धनगर वाड्यावरील.
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा तालुक्यातील आवंडी धनगर वाडा क्रमांक दोन येथे कान्हू विठू शेळके यांच्या घरी सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास अचानकपणे बिबट्याने अचानक प्रवेश केल्याने शेळके कुटुंबीय गोंधळून गेले. दरम्यान गोठ्यातील शेळीवर बिबट्याने हल्ला करून ठार मारले. सुदैवाने इतर जनावरे व शेळके कुटुंबीय बचावले.
याबाबत मिळालेली माहिती अशी…
धनगर वाडा क्रमांक दोन येथे शेळके दांपत्य रहाते. सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांना जनावरांचा गोंधळ ऐकू आला. घराच्या पाठीमागच्या खोलीत त्यांनी येऊन पाहिले असता बिबट्याने एका शेळीवर हल्ला करून तिला आपल्या ताब्यात घेऊन ओढून नेत असताना दिसले. शेळके कुटुंबीयांनी त्याच्यावर बॅटरीचा प्रकाशझोत टाकला व गोंधळ केला. हा गोंधळ पाहून बिबट्याने जखमी शेळी तिथेच टाकून जंगलाच्या दिशेने पळ काढला कालांतराने सदर शेळी मृत पावली. शेळके कुटुंबियांनी प्रसंगावधान दाखवल्याने इतर जनावरे बचावली. बिबट्याच्या बंदोबस्ताचे होणार तरी काय आव्हान वनविभागा समोर निर्माण झाले आहे.
