वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याची हंगाम अखेरची संपुर्ण ऊस बिले जमा.
आजरा.- प्रतिनिधी.
वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्यांने १ फेब्रुवारी २०२४ पासून हंगाम अखेर गाळपास आलेल्या ऊस बिलाची रक्कम विनाकपात रू. १९ कोटी ९२ लाख ४६ हजार व तोडणी वाहतुकीच्या संपुर्ण बिलाची रक्कम रू.२ कोटी १७ लाख ४५ हजार अशी एकूण रक्कम रू. २२ कोटी ९ लाख ९२ हजार संबधित ऊस पुरवठादार शेतक-यांच्या व तोडणी वाहतुकदारांच्या सेव्हींग बैंक खातेवर जमा करण्यात आली असले बाबतची माहिती कारखान्याचे चेअरमन वसंतराव धुरे यांनी दिली. तरी संबंधी ऊस पुरवठादार शेतकरी व तोडणी वाहतुकदारांनी आपल्या बँकेशी संपर्क साधुन बिल उचल करावे. हंगाम २०२३/२४ मध्ये करखान्यास कोल्हापूर जिल्हा मध्य. सह. बँकेचे अध्यक्ष ना.हसन मुश्रीफ, वैद्यकिय शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे मार्गदर्शना खाली जिल्हा बँकेच्या सहकार्याने कारखान्याकडे गाळपास आलेल्या संपुर्ण ऊसाची बिले विनाकपात एकरक्कमी तसेच तोडणी वाहतुकीची बिले देखील आदा केली आहेत. याबाबत कारखान्यांने दिलेल्या माहिती नुसार या गळीत हंगामात संकेश्वर-बांदा महामार्गाचे सुरू असलेले काम व इतर कारखान्यांचे प्रमाणे आमचे कारखान्याकडेही करार केलेली संपुर्ण तोडणी वाहतुक यंत्रणा न आलेंने गळीत हंगामात पुर्ण क्षमतेंने ऊस पुरवठा झाला नाही. त्यामुळे हंगामात व्यत्यय निर्माण होवून त्याचा गळीतावर परिणाम झाला. म्हणून गाळपाचे उद्दिष्ट पुर्ण होवू शकले नाही. परंतू येत्या गळीत हंगामामध्ये सक्षम तोडणी वाहतुक यंत्रणा उभारून 4 लाख मे. टनाचे गाळपाचे उद्दिष्ट संचालक मंडळाने ठेवले असून त्याची पुर्व तयारीही सुरू झालेली आहे. तरी विश्वासू व प्रामाणिक तोडणी वाहतुक कंत्राटदारांनी कारखान्याशी संपर्क साधून तोडणी ओढणीचे करार करावेत. त्याचबरोबर कार्यक्षेत्रातील, गडहिंग्लज व चंदगड तालुक्यातील ‘शेतक-यांनी आपल्या कारखान्याच्या शेती सेंटर ऑफिसशी संपर्क साधून संपुर्ण ऊसाच्या नोंदी व करार करावेत असे आवाहन चेअरमन यांनी केले. यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन मधुकर देसाई, जिल्हा बँकेचे संचालक तथा बैंक प्रतिनिधी सुधीर देसाई, कारखान्याचे संचालक विष्णू केसरकर, उदयसिह पोवार, मुकुंदराव देसाई, मारूती घोरपडे, सुभाष देसाई, अनिल फडके, दिपक देसाई, रणजित देसाई, संभाजी रामचंद्र पाटील, शिवाजी नांदवडेकर, राजेंद्र मुरूकटे, राजेश जोशीलकर, संभाजी दत्तात्रय पाटील, गोविंद पाटील, अशोक तर्डेकर, काशिनाथ तेली, हरी कांबळे, संचालिका सौ. रचना होलम, सौ. मनिषा देसाई, तसेच कारखान्याचे तज्ञ संचालक नामदेव नार्वेकर, रशिद पठाण आणि प्र. कार्यकारी संचालक व्ही. के. ज्योती व अधिकारी उपस्थित होते.