डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले जयंती निमित्त महागोंड येथे अंगणवाडीत अंकलपी, खाऊ वाटप.
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथील सावित्रीबाई सेवाभावी संस्था या संस्थेच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे अवचित साधुन महागोंड ता. आजरा येथील अंगणवाडी क्रं १ व २ येथे बाल विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना अंकलपी व खाऊ वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावित्रीबाई सेवाभावी संस्थेच्या अध्यक्ष जयश्री कांबळे होत्या. स्वागत व प्रस्ताविक उपाध्यक्ष नीता बोलके यांनी केले. अध्यक्ष स्थानावरून बोलताना सौ कांबळे म्हणाल्या आम्ही सावित्रीच्या लेखी आहोत ज्यांच्या आम्ही घडलो त्यांच्या विचारानुसार समाजात काम केले पाहिजेत आज घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीचे अवचित साधून आम्ही आमच्या सेवाभावी संस्थेचे कार्याची सुरुवात ही खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने सामानगडावरून केली आहे. पण आज लहानापासून थोरापर्यंत समाजकार्यात सामाजिक बांधिलकी जपावी यासाठी अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना आम्ही खाऊ व अंकलपी वाटप करत आहोत. थोर पुरुषांचा विचारांचा वारसा खांद्यावर घेऊन आमची वाटचाल समाजात संस्थेच्या माध्यमातून कार्य करण्याची आहे. व हाच ध्येय, ध्यास व उद्देश आमच्या डोळ्यासमोर आहे. असे बोलताना अध्यक्ष सौ कांबळे म्हणाल्या. यावेळी जुबेर शेख यांच्या हस्ते महात्मा ज्योतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन अंगणवाडी सेविका शशिकला पाटील, अंजना पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. अंकलपी व खाऊ वाटप संस्थेच्या पदाधिकारी सदस्य मुस्कान शेख, सरिता कांबळे, अर्चना देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सावित्रीबाई सेवाभावी संस्थेच्या मुख्य शाखेच्या सदस्य ज्योती कांबळे यांनी केले. यावेळी अंगणवाडी मदतनीस नीलम सुतार, सुजाता जाधव, मनोज कुमार कांबळे, शिवाजी पाटील, दयानंद परीट, सौरभ कांबळे सह नागरिक सावित्रीबाई सेवाभावी संस्थेचे महागोंड शाखेच्या महिला सदस्य, नागरिक उपस्थित होते. आभार रेखा परीट यांनी मानले. राष्ट्रगीता नंतर कार्यक्रम संपला.