HomeUncategorizedनवी मुंबईत केमिकल कंपनीला भीषण आग.- सर्वत्र धुराचे लोट.- 🅾️अग्निशमन दल घटनास्थळी

नवी मुंबईत केमिकल कंपनीला भीषण आग.- सर्वत्र धुराचे लोट.- 🅾️अग्निशमन दल घटनास्थळी

🔥नवी मुंबईत केमिकल कंपनीला भीषण आग.- सर्वत्र धुराचे लोट.- 🅾️अग्निशमन दल घटनास्थळी

नवी मुंबई :- प्रतिनिधी.‌

नवी मुंबईतून आगीची मोठी घटना समोर आली आहे. नवी मुंबईच्या खैरणे एमआयडीसीमधील एका इंडस्ट्रियल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या कंपनीला आग लागल्यानंतर परिसरातील नागरिकांची एकच धावाधाव झाली. कंपनीला आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत.
🟥मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील खैरणे येथील एमआयडीसीमधील नवभारत इंडस्ट्रियल केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली. आज मंगळवारी सकाळच्या सुमारास ही आग लागल्याची घटना घडली. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट नाही. आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे पाच अग्निशमन दलाचे अग्निबंब घटनास्थळी पोहोचले आहेत.
🅾️अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आहेत. त्यांनी आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु केले आहेत. नवी मुंबईतील ही केमिकल कंपनी असल्याने आगीची भीषणता मोठी आहे. एमआयडीसी असल्याने आजूबाजूला अनेक केमिकल कंपन्या आहेत. या कंपनीत कुणी अडकलेले नसल्याची माहिती मिळत आहे. तसेच या घटनेत कुणालाही दुखापत झाल्याचे अद्याप वृत्त नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.