शेतकऱ्यांना उध्वस्त करणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाचा डाव हाणून पाडू…..
इंडिया आघाडीच्या जनसंपर्क यात्रेत बाधित शेतकऱ्यांना आश्वासन……
आजरा- प्रतिनिधी.
केवळ ठेकेदारांना सांभाळण्यासाठीचं शक्तीपीठ महामार्गाच्या घाट सरकारने घातला आहे. पर्यावरणाची नासाडी करून शेतकऱ्यांना उध्वस्त करणाऱ्या सरकारला या लोकसभा निवडणुकीत येथील शेतकरी हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाहीत असे प्रतिपादन कॉ. संपत देसाई यांनी केले. आज इंडिया आघाडीच्या वतीने आजरा तालुक्याच्या पश्चिम भागाच्या जनसंपर्क दौऱ्यात खेडगे येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष मुकुंददादा देसाई, माजी जिप अध्यक्ष उमेश आपटे, माजी सभापती उदयराज पवार, गोकुळच्या संचालिका अंजना रेडेकर, अभिषेक शिंपी, शिवसेना (उभाठा) तालुकाध्यक्ष राजेंद्र सावंत, संजय भाऊ सावंत, वंचित आघाडीचे संतोष मासाळे, राजू होलम, इंडिया आघाडीचे तालुका समन्वयक रविंद्र भाटले, प्रकाश मोरुस्कर यांच्यासह इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे कार्यकर्ते व खेडगे, पारपोली, शेळप, दाभील, धनगरमोळा येथील शेतकरी मोठ्या संखेने उपस्थित होते.
ते आपल्या भाषणात पुढे म्हणाले कि मुळात शक्तीपीठ महामार्गाची गरजच काय असा आमचा प्रश्न आहे. केवळ ठेकेदारांना आणि त्यातून मिळणाऱ्या टक्केवारीला डोळ्यासमोर ठेऊन शिंदे, फडणवीस आणि पवार सरकारने या महामार्गाचा घाट घातला आहे. खरतरं पश्चिम घाटाचा हा सारा परिसर अतिसंवेदनशील आहे. या महामार्गाने शेतकरी उध्वस्त तर होणारच पण याबरोबरच इथल्या पर्यावरणाचीही भयंकर मोठी हानी होणार आहे. त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग विरोधी लढ्यात आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत आहोत.
सकाळी ९ वाजता पेरणोली येथून जनसंपर्क दौऱ्याला सुरवात झाली. सकाळच्या टप्प्यात हरपवडे, कोरीवडे, देवकांडगाव, विनायकवाडी, मेढेवाडी या गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी कॉ.संजय तर्डेकर, रणजीत देसाई, अजित देसाई, विक्रम देसाई, उत्तम देसाई, सुरेश कालेकर, उदय कोडक, सचिन देसाई, संकेत सावंत, नौशाद बुड्ढेखान हरिबा कांबळे, धनाजी सावंत, एस पी कांबळे, सुरेश पाटील, मारुती पाटील, सुभाष देसाई, प्रताप देसाई यांच्यासह या गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर दुपारच्या टप्प्यात शक्तीपीठ महामार्ग ज्या गावातून जाणर आहे त्या पारपोली, शेळप, दाभील, खेडगे या गावात जनसंपर्क दौरा झाला. यावेळी गंगाराम ढोकरे, संतोष पाटील, प्रकाश शेटगे, बाळू पाटील, शांताराम पाटील, धाकू कविटकर यांच्यासह वरील गावतील नागरिक उपस्थित होते.
