आजरा गवसे महामार्गावरील तपासणीबाबत.- पोलिस निरीक्षकसो, महामार्ग पोलिस, उजळाईवाडी, कोल्हापूर ज्यांना उभाठा शिवसेनेचे निवेदन.
आजरा.- प्रतिनिधी.
मागील पाच सहा महिन्यापासून आजरा गवसे महामार्गावरील वाहनांची तपासणी होऊन नागरिकांना त्रास देत पैसे घेतले जातात. याबाबत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. गेले अनेक दिवस आपल्या विभागाचे पोलिस आजरा ते गवसे या मार्गावरी उभा राहून गाड्या अडवून तपासणी करत आहेत. सद्या संकेश्वर ते बांदा महामार्गाचे काम युद्ध पातळीवर चालू आहे. रस्त्यांची खुदाई चालू आहे. यातच या मार्गावर गोवा पर्यटक असल्यामुळे वाहतूकीचे प्रमाण वाढत असल्यामुळे आजरा तालुक्यातील नागरीकांना विनाकारण अडवून उभा केले जाते व नाहक त्रास दिला जातो व त्यांच्याकडून पैसे घेतले जातात अश्या तकारी आहेत. तरी सदर घटनेची चौकशी करून हे सर्व प्रकार तात्काळ बंद करावे अन्यथा शिवसेनोच्या वतीने आपल्या कार्यालयावर आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी.