HomeUncategorizedदेवर्डे शाळेत सलग सतराव्या वर्षी योगा शिबिर संपन्न.🛑कुडाळ तालुक्यातील पोलीस पाटील पदाची...

देवर्डे शाळेत सलग सतराव्या वर्षी योगा शिबिर संपन्न.🛑कुडाळ तालुक्यातील पोलीस पाटील पदाची निवड सूची कुडाळ प्रांताधिकारी यांच्याकडून अखेर जाहीर.

🛑देवर्डे शाळेत सलग सतराव्या वर्षी योगा शिबिर संपन्न.
🛑कुडाळ तालुक्यातील पोलीस पाटील पदाची निवड सूची कुडाळ प्रांताधिकारी यांच्याकडून अखेर जाहीर.

आजरा.- प्रतिनिधी.

देवर्डे तालुका आजरा येथील विद्या मंदिर व श्री रवळनाथ हायस्कूल देवर्डेत सलग १७ वर्षी योगा शिबिराला प्रारंभ झाला. योगा शिक्षक सुनील सुतार यांनी 2008 ला* योगा शिबिराची सुरुवात केली उन्हाळी सकाळी सत्रा मध्ये पंधरा दिवसाचे योगा शिबिराचे आयोजन केले जाते. पहिली ते नववीचे २२० विद्यार्थी सहभागी झाले आहेत यावर्षी सहाय्यक शिक्षक राजेंद्र पाटील योगासनाचे आसने विद्यार्थ्यांच्याकडून करून घेत आहेत यामध्ये गायत्री मंत्र ओमकारासह अनुलोम-विलोम कपालभारती प्राणायाम सुखासन पद्मासन पर्वतासन पश्चिमोत्तासन वज्रासन नौकासन पवन मुक्त आसन सर्वांग आसन हलासन चक्रासन शवासन भुजंगासन धनुरासन ताडासन वृक्षासन त्रिकोणासन वातघ्न आसन विद्यार्थ्यांचा प्रतिसाद चांगला मिळत आहे या उपक्रमामध्ये मुख्याध्यापक नामदेव माईनकर सुभाष सावंत सुनील पाटील चंद्रकांत घुरे सरोजिनी कुंभार रेश्मा बोलके महादेव तेजम श्रीकांत पाटील महेश नावलगी देवेंद्र शिखरे या शिक्षकासह विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होत आहेत.

🔴कुडाळ तालुक्यातील पोलीस पाटील पदाची निवड सूची कुडाळ प्रांताधिकारी यांच्याकडून अखेर जाहीर..

कुडाळ :- प्रतिनिधी.

कुडाळ उपविभाग दंडाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील पोलीस पाटील पदाची निवड सूची कुडाळ प्रांताधिकारी ऐश्वर्या काळूसे यांनी जाहिर केली असून यामध्ये कुडाळ तालुक्यातील ६० पोलिस पाटील पदी निवड झालेल्या उमेदवारांची निवड सुची तसेच कुडाळ ३१ जण प्रतिसुचीवर आहेत.निवड सुचित जाहीर होतात निवडपात्र उमेदवारांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.आता निवड सुची जाहिर झालेल्या उमेदवारांना लोकसभा निवडणुकीतील आचारसंहिता जाहिर झाली असल्यामुळे नियुक्ती पत्र आचारसंहितेनंतरच हाती मिळणार आहे.
🟥कुडाळ तालुक्यात निवड झालेल्या उमेदवारांची नावे खालीलप्रमाणे आहेत.

कुडाळ तालुका – समीर वालावलकर ( वालावल) ज्ञानेश्वर तांडेल ( मुणगी), बाबली पिंगुळकर (देऊळवाडी), आर्या कदम ( बांव),अजित जाधव ( केरवडे तर्फ माणगांव), तुषार जाधव ( जांभरमळा), सोनु कानडे ( नमसगांव), निशा ठाकूर ( रूमडगांव), भिवा भोई ( ढोलकरगांव), राजन शिंदे ( गोठोस), प्रकाश डोईफोडे ( मोरे), शितल झोरे ( मिटक्याचीवाडी), अरविंद बिले ( बेलनदी), गंगाराम पारकर ( बोरभाट), रघुनाथ हळदणकर ( गावधड), अभिषेक काणेकर ( कट्टागाव), रामचंद्र पेडणेकर ( गांधीग्राम), शुभश्री श्रृंगारे ( नाईकनगर), शमिका हरमलकर ( झाराप), प्रशांत पिरवरे ( दुर्गानगर), राजन राणे ( साकिर्डे), अक्षता सावंत ( टेंबगाव), शिवराम गावडे ( मडगांव), समिजा सावंत ( कांदुळी), श्रावणी सावंत ( कुपवडे), सुरजित गावडे ( माणकादेवी), रणजित परब ( बांबूळी), दिपक घाडी( घाडीगाव), विद्याली परब ( कारीवणे), सरोज काजरेकर ( भरणी), निलेश गुरव ( सोनवडे तर्फ कळसुली), सुरेश नाईक ( कुटगाव), प्रितम सावंत ( पांग्रड), सतिश माड्ये ( पिंगुळी), अमित चव्हाण ( गोंधळपूर), विदीती सावंत ( साळगाव), भाग्यश्री गावकर ( कुसबे), हेमंत वारंग ( हुमरस), शाम धुरी ( बेनगाव), वैभव ढवळे ( नेरूर क. नारूर), हेमंत मातोंडकर ( कविलकाटे), सदफ खुल्ली ( गोंधयाळे), अदिती देसाई ( तळीगांव), सुवर्णा म्हाडदळकर ( कविलगाव), स्नेहा मुंगारे ( सांगिर्डे ), निखिल गोसावी ( नाईकवाडी), स्वप्निल परब ( तळेगांव), हर्षिता ठाकुर ( आंदुर्ले), श्वेता मेस्त्री ( साईगाव), अक्षय नेरूरकर ( कांडरगाव), आरोही गोसावी ( गवळगांव),अक्षय राऊळ ( मुड्याचाकोंड), रविंद्र कदम ( चाफेली), मानसी खोचरे ( नमसपूर), वैभव धुरी ( टेंबधुरीनगर), पूनम तेरसे ( निरूखे), राघो सावंत ( हुमरमळा), विशाल चव्हाण ( गांधीनगर), छाया कोकरे ( खोचरेवाडी), समिर तोरस्कर ( खुटकरवाडी) अशाप्रकारे 60 उमेदवारांची पोलिस पाटील पदी निवड झाली असुन 31 जण प्रतिसुचीवर राहिले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.