HomeUncategorizedप्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत राधानगरी तालुक्यातील ९ विकास कामांना ५ कोटी रुपयांचा निधी...

प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत राधानगरी तालुक्यातील ९ विकास कामांना ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर :- आम. प्रकाश आबिटकर. कोवाडेत नव्या लक्ष्मी देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना भव्य मिरवणूक. गड संवर्धन ही काळाची गरज.- राजा शिवछत्रपती परिवार महाराष्ट्र. अध्यक्ष गुरुवर्य आशिष घोरपडे.

प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत राधानगरी तालुक्यातील ९ विकास कामांना ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर :- आम. प्रकाश आबिटकर

गारगोटी प्रतिनिधी.

राधानगरी तालुक्यातील ९ गावातील विविध विकास कामांसाठी शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दि.११ मार्च रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, शासनाच्या विविध विभागांमधून राधानगरी विधानसभा मतदार संघासाठी जास्तीत-जास्त निधी कसा मिळेल यासाठी माझे प्रयत्न सुरू असतात. राधानगरी विधानसभा मतदार संघामध्ये पर्यटनदृष्ट्या विकसीत करण्यासाठी मोठा वाव असून मतदार संघ पर्यटनदृष्ट्या विकसीत करण्यासाठी माझा प्रयत्न सुरू असतो. राधानगरी तालुक्यातील पर्यटन स्थळे विकसित करण्याच्या दृष्टीने विविध पर्यटन स्थळांच्या अंतर्गत येणार्यात देवस्थानांना पायाभुत सुविधा पुरवून त्या ठिकाणी विविध पर्यटक, भाविक, नागरिक यांना विविध सोयी सुविधा पुरविण्यात याव्यात यासाठी प्रयत्न सुरू ठेवले होते. या प्रयत्नांना यश आले असून 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून या निधीतून आता देवस्थानांचा पर्यटन स्थळ म्हणून विकास होणार आहे.

यामध्ये कसबा तारळे येथील हनुमान मंदीरसाठी सभामंडप बांधकाम व परिसर विकसीत करणे 1 कोटी, घोटवडे येथील हनुमान हनुमान मंदीरसाठी सभामंडप बांधकाम व परिसर विकसीत करणे ७० लाख, जोतिर्लिंग देवालय सावर्डे (पा.) येथील परिसर सुशोभिकरण करणे ५० लाख, जोतिर्लिंग देवालय आवळी बुद्रुक येथील परिसरात सुशोभिकरण करणे ५० लाख, चक्रेश्वरवाडी येथील शिखर परिसर खगोलीयदृष्ट्या महत्वाचा असल्याने वॉच टॉवरसर अन्य सोई सुविधा उपलबध करून परिसर सुशोभिकरण करणे १००, राज्य मार्ग घोटवडे येथे स्वागत कमान व जंक्शन सुधारणा करणे ३० लाख, राज्यमार्ग शेळेवाडी येथे स्वागत कमान व जंक्शन सुधारणा करणे ३० लाख, राज्य मार्ग दाजीपूर (ओलवण) येथे स्वागत कमान व जंक्शन सुधारणा करणे ३५ लाख, बुजवडे येथील खुळोबा देवालय कडे जाणारा रस्ता व परिसर विकसीत करणे ३५ लाख, लाख आदी कामांचा समावेश करण्यात आला आहे.
याकामी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व पर्यटनमंत्री गिरीष महाजन यांचे सहकार्य लाभले असल्याचे प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे.

🛑कोवाडेत नव्या लक्ष्मी देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना भव्य मिरवणूक.

आजरा.- प्रतिनिधी.

कोवाडे ता. आजरा येथील २२ वर्षांनी होणाऱ्या यात्रेनिमित्त लक्ष्मी देवीची मूर्ती नव्याने लोकवर्गणीतून ५ लाख रुपये खर्च करून मुर्ती तयार करण्यात आली आहे.
एप्रिल ३० रोजी लक्ष्मी देवीची यात्रा व स्नेहभोजन १ में रोजी आहे
मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना भव्य मिरवणुकन गुलाबाची उधळन करत जुन्या पारंपारिक पद्धतीने दुरडी सोडण्याचा कार्यक्रम करण्यात आला गावातील कुटुंबातील एक दुरडी व गावातील लग्न होऊन गेलेल्या माघारीन परगावातून येऊन सहभाग नोंदवला.‌ शिरसंगी ता. आजरा येथील कारागिराने सदर मूर्ती तयार केली आहे. या गावातून मूर्ती ग्रामस्थांच्या ताब्यात देत असताना दुरडी सोडणे व स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला.‌
ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी महिला व पुरुष यांचे लेझीम पथकाचे सादरीकरण करण्यात आले यामुळे मिरवणुकीला रंगत आली. यावेळी यात्रा कमिटीचे अध्यक्ष मनोहर जगदाळे उपाध्यक्ष भास्कर देसाई, तसेच खजिनदार नारायण मूरुकटे, विजय जांभळे, शिवाजी देवेकर सह जुने जाणकार ग्रामस्थ नागोजी होरडे, तुकाराम जगदाळे सरपंच संतोष चौगुले, उपसरपंच वंदना देसाई, सर्व ग्रामपंचायत सदस्य यात्रा कमिटीचे सर्व सदस्य ग्रामस्थ यांच्या सहकाऱ्यांनी लक्ष्मीदेवी मूर्ती प्रतिष्ठान कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

🛑🚩गड संवर्धन ही काळाची गरज.- राजा शिवछत्रपती परिवार महाराष्ट्र. अध्यक्ष गुरुवर्य आशिष घोरपडे.

अमरावती.- प्रतिनिधी.

महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्या येथे राजा शिवछत्रपती परिवार महाराष्ट्र यांची मुख्य मोहीम श्री क्षेत्र शेगाव ते गाविलगड दर्शन व स्वच्छता मोहीम शनिवार व रविवार १६ व १७ मार्च रोजी संस्थापक गुरुवर्य सुनील घोरपडे, व अध्यक्ष आशिष घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली हि मोहीम संपन्न झाली.
या मोहिमेला महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील नियोजन मंडळ व सर्व मावळे मोठ्या संख्येने मोहिमेत सहभागी झाले होते.
मोहिमेसाठी अमरावती परिवार व मुख्य अष्टप्रधान मंडळ यांच्या सहकार्याने मार्गदर्शनाखाली मोहिमेचे नेटके नियोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्राची शान म्हणजेच ऐतिहासिक वास्तू गडकोट येथील मंदिरे आहेत. या मंदिराच्या वास्तू जिवंत राहाव्यात येथे स्वच्छता राहावी पवित्र्य, जपावं यासाठी राजा शिवछत्रपती परिवार संस्था संपूर्ण महाराष्ट्रात कार्य करत आहे. श्री छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हाच तो किल्ले गाविलगड अमरावती क्षेत्र शेगाव गजानन महाराज हे दोन्हीही आपल्या स्वराज्याचे अभी अविभाज्य घटक आहेत. यांच्या सेवेची राजा शिवछत्रपती परिवार संस्था संपूर्ण महाराष्ट्रात सेवेसाठी मोहीम आयोजित केली होती.
महाराष्ट्रातील या मोहिमेत , सहभागी सर्व मावळे व रणरागिनी बाल मावळे, सहभागी होत उत्साहात गाविलगड येथे स्वच्छता मोहीम करण्यात आली. अमरावती जिल्ह्यातील मावळ्यांनी या मोहिमेसाठी सर्वात अधिक परिश्रम घेतले व मोहीम फत्ते केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.