HomeUncategorizedलोकसभा निवडणुकीची उद्या घोषणा होणार - निवडणूक आयोगाची बैठक पार.🛑फडणवीसांच्या निवासस्थानी नेत्यांची...

लोकसभा निवडणुकीची उद्या घोषणा होणार – निवडणूक आयोगाची बैठक पार.🛑फडणवीसांच्या निवासस्थानी नेत्यांची गर्दी‌- आचारसंहिता लागण्याची शक्यता

🛑लोकसभा निवडणुकीची उद्या घोषणा होणार – निवडणूक आयोगाची बैठक पार.
🛑फडणवीसांच्या निवासस्थानी नेत्यांची गर्दी‌- आचारसंहिता लागण्याची शक्यता

नवी दिल्ली :- वृत्तसंस्था.

लोकसभा निवडणुकीच्या तारखा उद्या जाहीर होणार आहेत. उद्या दुपारी ३ वाजता निवडणुक आयोगाची पत्रकार परिषद आहे. या पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहिर केल्या जातील. त्यानंतर देशतात आचारसंहिता लागू होईल. दिल्लीत आज निवडणूक आयोगाची बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबत आढावा घेण्यात आला. यंदा 7 ते 8 टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे.

गुरुवारी दोन नव्या निवडणूक आयुक्तांची निवड करण्यात आली होती. त्यानंतर आज निवडणूक आयुक्त सुखबीर संधू आणि ज्ञानेश कुमार यांनी आपल्या कार्यभार सांभाळला. मुख्य निडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दोघांचं स्वागत केलं. सकाळी अकरा वाजता निवडणूकीच्या तारखांबाबत महत्त्वाची बैठक पार पडली. त्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्तांनी शुक्रवारी दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद होणार असल्याची माहिती दिली. या पत्रकार परिषेदेत लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली जाणार आहे. लोकसभेच्या एकूण 543 जागा आहेत. गेल्या म्हणजे 2019 लोकसभा निवडणुकीत भाजपाने 303 जागा पटकावल्या होत्या. तर काँग्रेसला केवळ 52 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. यावेळी भाजपचं नेतृत्व असलेल्या एनडीए आणि विरोधकांच्या इंडिया आघाडीत मुख्य लढत असणार आहे.

लोकसभा निवडणुकीसह ओडिशा, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेशात विधानसभा निवडणुका होणार आहेत. लोकसभा निवडणुका सात ते आठ टप्प्यांत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. नवनियुक्त निवडणूक आयुक्तांच्या औपचारिक स्वागतानंतर आयोगाची बैठक झाली. ही बैठक जवळपास ४५ मिनिटे चालली. निवडणूक आयोगाच्या आजच्या बैठकीत निवडणुका निष्पक्ष, शांततेने व्हाव्यात यासाठी संवेदनशील क्षेत्रांत आणि राज्यांमध्ये किती मनुष्यबळ तैनात करावे लागेल, याबाबतचा आढावा घेण्यात आल्याचे समजते. याव्यतिरिक्त किती टप्प्यांत निवडणूक कार्यक्रम घ्यायचा आहे? कोणत्या राज्यांत आधी आणि कोणत्या राज्यांत नंतर निवडणुका घेतल्या जाऊ शकतात, या आणि अशा अनेक मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगण्यात येते.

फडणवीसांच्या निवासस्थानी नेत्यांची गर्दी‌- आचारसंहिता लागण्याची शक्यता

नागपूर – प्रतिनिधी.

उद्यापासून म्हणजे १६ मार्चला निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद आयोजित केली आहे. त्यामुळे निवडणुकीची घोषणा होण्याची व आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे विविध पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्या मतदार संघातील विकास कामांबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या नागपूर येथील निवासस्थानी भेट घेतली. शुक्रवारी सकाळपासून फडणवीस यांना भेटणाऱ्यांची गर्दी होती, यातून अनेक राजकीय तर्कवितर्क लावले जात होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरूवारी सायंकाळी नागपूर मध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते. नागपूरमध्ये त्यांचा मुक्काम होता. शुक्रवारी सकाळपासून त्याना भाजपानेत्यांसह इतर पक्षाचेइनेते भेटले. सकाळी सकाळी कॉंग्रेसचे उमरेडचे आमदार राजू पारवे भेटले. त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार तर्कवितर्क लावले जात आहे. मतदारसंघातील विकास कामांसाठी ही भेट होती, असे पारवे यांनी सांगितले. गडचिरोलीचे खासदार अशोक नैते फडणवीस यांना भेटले. अद्याप भाजपने गडचिरोलीच्या उमेदवाराची घोषणा केली नाही. नेते भाजपचे विद्यमान आहेत. दरम्यान निवडणूक आयोगाने उद्या लोकसभा निवडणुकीची घोषणा करण्याचे ठरवल्याने व लगेच आचारसंहिता लागू होणार असल्याने सर्व पक्षीय आमदार व इतर लोकप्रतिनिधींनी मतदारसंघातील कामांसाठी व ते मार्गी लावण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून फडणवीस यांची भेट घेतली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.