Homeकोंकण - ठाणेटीईटी’ची वैधता अमर्याद.- एकदा उत्तीर्ण झाल्यास उमेदवार नोकरीसाठी पात्र.

टीईटी’ची वैधता अमर्याद.- एकदा उत्तीर्ण झाल्यास उमेदवार नोकरीसाठी पात्र.

‘टीईटी’ची वैधता अमर्याद.-
एकदा उत्तीर्ण झाल्यास उमेदवार नोकरीसाठी पात्र

मुंबई :प्रतिनिधी.४-

शिक्षक पात्रता परीक्षेची (टीईटी) सात वर्षांच्या वैधतेची अट केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने रद्द केली असून त्यामुळे लाखो उमेदवारांचा जीव भांड्यात पडला आहे. नव्या तरतुदीनुसार एकदा या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यास उमेदवार नोकरीसाठी पात्र ठरणार आहेत. राज्यातील ३१ हजार उमेदवारांची वैधता जानेवारीत संपत असल्यामुळे या परीक्षेवरून राज्यातही वाद उद्भवला होता.
शिक्षण हक्क कायद्यानुसार शिक्षक होण्यासाठी टीईटी बंधनकारक करण्यात आली. राष्ट्रीय शिक्षक प्रशिक्षण परिषदेने (एनसीटीई) २०११ मध्ये याबाबत परिपत्रक काढले. नियमानुसार या परीक्षेची वैधता सात वर्षे होती. म्हणजेच परीक्षेत पात्र ठरल्यावर त्या प्रमाणपत्राआधारे सात वर्षेच नोकरीसाठी पात्र ठरणार होते. मात्र, गेल्या काही वर्षांत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी टीईटी, प्रत्येक राज्याची परीक्षा यातील लाखो उमेदवार नोकरीसाठी पात्र ठरले होते. मात्र, त्या तुलनेने नोकऱ्या उपलब्ध नसल्यामुळे उमेदवारांचे प्रमाणपत्र अवैध ठरले असते. मात्र, आता केंद्राने या प्रमाणपत्राची वैधता अमर्याद केली आहे. म्हणजेच सात वर्षांची अट काढून टाकण्यात आली आहे. त्यामुळे एकदा ही परीक्षा उत्तीर्ण केलेले उमेदवार शिक्षक पदासाठी पात्र ठरणार आहेत.
राज्यातील स्थिती…
राज्याने २०१३ मध्ये पहिली टीईटी घेतली. राज्यातील पटपडताळणीनंतर हजारो शिक्षक अतिरिक्त झाल्यामुळे आणि शिक्षक भरतीच्या प्रक्रियेतील गोंधळामुळे शासनाने शिक्षक भरतीवर बंदी घातली. तरीही टीईटीचे आयोजन केल्यावर शिक्षणशास्त्रातील पदवी किंवा पदविका घेतलेल्या लाखो उमेदवारांनी टीईटी दिली. राज्यात २०१६ हे वर्ष वगळता २०१३ पासून २०१८ पर्यंत दरवर्षी टीईटी झाली. या कालावधीत राज्यात ६९ हजार ७०६ उमेदवार पात्र ठरले आहेत. मात्र या उमेदवारांना नोकऱ्या मिळू शकल्या नाहीत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.