Homeकोंकण - ठाणेआरोग्य प्रशासनाकडून धाक.- दडपशाहीने होणाऱ्या अनावश्यक कोविड चाचण्यांमुळे जिल्ह्यातील नागरिक त्रस्त…

आरोग्य प्रशासनाकडून धाक.- दडपशाहीने होणाऱ्या अनावश्यक कोविड चाचण्यांमुळे जिल्ह्यातील नागरिक त्रस्त…

आरोग्य प्रशासनाकडून धाक.- दडपशाहीने होणाऱ्या अनावश्यक कोविड चाचण्यांमुळे जिल्ह्यातील नागरिक त्रस्त…

सिंधुदुर्ग प्रतिनिधी

राज्यात 100 कोटी वसुलीचं टार्गेट प्रकरण ताजं असताना सिंधुदुर्गात आरोग्य प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना दिले कोविड चाचण्यांचे “टार्गेट..?”
तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात लसीकरणासाठी व राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण (NCD) कार्यक्रमांतर्गत मासिक औषधे घेण्यासाठी आरोग्य केंद्रात जाणाऱ्या नागरिकांची जबरदस्तीने करण्यात येते कोविड चाचणी. – मनसेचा आरोप
सिंधूदुर्ग जिल्ह्यातील दिवसेंदिवस वाढते कोविड रुग्ण व एकूण उद्भवलेली परिस्थिती हाताळण्यास नियोजनशून्यतेमुळे आरोग्य यंत्रणा सपशेल निष्क्रिय ठरत आहे असे चित्र निर्माण झाले आहे.एवढया महामारीतही जिल्हात प्रभारी शल्य चिकित्सक अधिकाऱ्यांमार्फत कारभार हाकावा लागतोय यावरून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी जिल्हावासीयांबाबत किती गंभीर आहेत याची प्रचिती येते.त्यात आरोग्य यंत्रणा आजकाल लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांची व NCD कार्यक्रमांतर्गत मासिक औषधे घेण्यासाठी येणाऱ्यांची देखील जबरदस्तीने कोरोना टेस्ट करत आहे याची कीव येते. आरोग्य यंत्रणा राज्य स्तरावर निगेटिव्हिटी सरासरी दाखवण्याच्या नादात नागरिकांना मनःस्ताप देत आहे हे दुर्दैव आहे.प्रशासनाने पोलीस धाक दाखवून बळजबरीने कोविड चाचण्यांसाठी शक्ती पणाला लावण्यापेक्षा रुग्णांच्या उपचारांवर भर देऊन परिस्थिती नियंत्रणात आणावी असे मनसेकडून दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.