HomeUncategorizedआजऱ्यात पाणी लिकेची समस्या कायम.- उपाय शोधण्याची नगरपंचायतला गरज. हजारो लिटर...

आजऱ्यात पाणी लिकेची समस्या कायम.- उपाय शोधण्याची नगरपंचायतला गरज. हजारो लिटर पाणी वाया..

आजऱ्यात पाणी लिकेची समस्या कायम.- उपाय शोधण्याची नगरपंचायतला गरज. हजारो लिटर पाणी वाया..

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा नगरपंचायत हद्दीत राष्ट्रीय महामार्गाचे काम व पाणी लिकेची समस्या ही आजही कायम आहे.
हजारो लिटर पाणी वाया जात आहे वेळोवेळी राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे पाईपलाईन लिकेज होऊन हजारो लाखो लिटर पाणी वाया जात असताना. कोणत्या ठिकाणी पाईप आहे कुठून पाईप दुसऱ्या रस्त्याला जोडली आहे. व त्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाचे काम चालू असताना पाणीपुरवठा विभाग आजरा नगरपंचायत यांनी महामार्गाचे काम चालू असताना पाईपलाईन लिकेज होऊ नये याची दक्षता घेण्यासाठी घटनास्थळी जाऊन पाहणी करणे किंवा त्यावर पर्यायी मार्ग किंवा पाईपलाईन लिकेज झाल्यास पाणी वाया जाऊ नये म्हणून तात्काळ दुरुस्ती करणे अशा काही गोष्टी लागलीच झालेल्या दिसत नाहीत.
सोबत महामार्ग खुदाई कर्मचारी किंवा जबाबदार अधिकारी यांनी संबंधित हद्दीत खुदाई करताना पाईपलाईन लिकेज होऊन पाणी वाया जाऊ नये यासाठी नगरपंचायत पाणीपुरवठा विभागाला कल्पना देणे देखील गरजेचे आहे. परंतु पाईपलाईन लिकेज होऊन हजारो लिटर पाणी वाया जात आहे. परंतु येणार आहे काळात असे घडत राहिल्यास मे महिन्यामध्ये पाणी पाणी नागरिकांना म्हणावे लागेल.


यासाठी पाण्याची बचत व विनाकारण पाणी वाया जाऊ नये मागील काही दिवसापासून आजरा शहरातील नागरिकांनी सामाजिक काम म्हणून टँकरने पाणीपुरवठा करण्याचे काम हाती घेतले होते. पण आज पंचायत समिती गेट समोर पाईपलाईन लिकेज होऊन पाण्याची तळी तुबंली आहे. याकडे पाईपलाईन लिकेज काढण्यासाठी नगरपंचायत पाणीपुरवठा विभागाकडून प्रयत्न केले नाहीत. असे निदर्शनास येते. फक्त भिंतीवर लिहिण्यासाठी जल है तो जीवन है.. नाहीतर ते प्रत्यक्षात कृतीत आणलं पाहिजे यासाठी नगरपंचायत पाणीपुरवठा विभागाने पाण्याचे महत्त्व समजून घ्यावे
.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.