मराठी राजभाषा दिना निमित्त आजरा मनसेचा मराठीत स्वाक्षरी उपक्रम.साजरा
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा ता. येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विद्यार्थी सेना अध्यक्ष मा. अमित ठाकरे यांच्या आदेशाने आज दि २७ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक (शिवतीर्थ) पूजन करून छत्रपती संभाजी महाराज चौक आजरा येथे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने मराठी राजभाषा दिनानिमित्त मराठी स्वाक्षरी उपक्रम जिल्हा सरचिटणीस सुधीर सुपल, तालुका अध्यक्ष आनंदा घंटे व जिनहीत व विधी कक्ष परशुराम बामणे यांचे मार्गदर्शन खाली विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष कु. अश्विन एकनाथ राणे व. विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष कु. वैष्णव दळवी यांच्या नेतृत्वखाली उपक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमाला तमाम अजरेकर व सर्व विद्यार्थ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. गेले ३ वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे हा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे.” माझी मातृ भाषा माझा अभिमान”, “मराठी पाट्या”, यांसारखे मायबोली विषय घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना विविध उपक्रम घेत आहे. आणि या उपक्रमाला जनतेतून खूप चांगला प्रतिसाद भेटत आहे. इथून पुढे ही मराठी भाषेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आजरा तालुका कार्यक्रम/ उपक्रम करून आपल्या भाषेचा अभिमान आणि स्वाभिमान टिकवून ठेवणे साठी तत्पर आहे.
