🛑चंद्राबाई शांताप्पा शेंडुरे कॉलेज हुपरी.- यांचे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत गड संवर्धन – स्वच्छता मोहीम संपन्न.
🛑युवा पिढीला गड संवर्धन व स्वच्छता मोहीमेत सहभागी होणे ही काळाची गरज.प्रा. डॉ. संध्या माने
गडहिंग्लज.- प्रतिनिधी.

गडहिंग्लज सामानगड येथे रयत शिक्षण संस्थेचे चंद्राबाई शांताप्पा शेंडुरे कॉलेज हुपरी या कॉलेजचा राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत गड संवर्धन मोहीम दि. २४ रोजी संपन्न झाली.
श्री छत्रपती शिवाजी महाराज संत गाडगे महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने गड संवर्धन व दुर्ग स्वच्छता मोहीम या थोर महापुरुषांच्या जयंती व आजच्या तरुण पिढीला गड संवर्धन म्हणजे काय याची जाणीव करून देण्यासाठी सदर मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सामनगडावरील विविध ठिकाणावर विद्यार्थ्यांनी प्लास्टिक कचरा जमा करत व अन्य स्वच्छता केली. गडावरील विविध ठिकाणाची माहिती स्थानिक गड संवर्धन मावळे यांनी दिली. मोहिमेच्या सुरुवातीला ध्येय मंत्र व प्रेरणा मंत्र घेऊन स्वच्छता मोहीमेला सुरुवात केली
मोहिमेसाठी संयोजक म्हणून एनसीसी विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. संध्या माने, प्रा. डॉ.विजय घेजी, प्रा. सौरभ कांबळे यांचे सहकार्य मिळाले.
या मोहिमेला विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी स्वच्छता मोहीम साठी परिश्रम घेतले राजा शिवछत्रपती परिवार कोल्हापूर या परिवाराचे मावळे संतोष कोळी, अभय उत्तुरकर, संभाजी जाधव, शशी वाजंत्री या मोहिमेत सहभागी झाले होते.

