HomeUncategorizedव्यंकटराव ज्युनिअर कॉलेज आजरा. एच .एस .सी .परीक्षार्थींचा शुभेच्छा समारंभ संपन्न.🛑तीन दिवसीय...

व्यंकटराव ज्युनिअर कॉलेज आजरा. एच .एस .सी .परीक्षार्थींचा शुभेच्छा समारंभ संपन्न.🛑तीन दिवसीय मोफत उद्योजकता विकास प्रशिक्षण शिबीर संपन्न.- खास. श्री. महाडिक.

🛑व्यंकटराव ज्युनिअर कॉलेज आजरा. एच .एस .सी .परीक्षार्थींचा शुभेच्छा समारंभ संपन्न.
🛑तीन दिवसीय मोफत उद्योजकता विकास प्रशिक्षण शिबीर संपन्न.- खास. श्री. महाडिक.

आजरा:- प्रतिनिधी.

व्यंकटराव ज्युनिअर कॉलेजमध्ये एचएससी परीक्षा फेब्रुवारी २०२४ ला सामोऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न झाला .कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आजरा म्हणून शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी होते.
प्राचार्य आर जी कुंभार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तसेच नूतन संचालक अभिषेक शिंपी यांनी बारावीच्या विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले कोणताही तणाव न घेता परीक्षेला सामोरे कसे जावे तसेच भावी आयुष्यात शिक्षण घेण्यासाठी अडचण निर्माण होईल त्यांना मदतीचा हात सुद्धा पुढे केला आणि विद्यार्थ्यांना विश्वास दिला. यावेळी माजी प्राचार्य व संचालक सुनील देसाई सर यांनी देखील मुलांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले व अध्यक्षीय भाषणात मा. श्री शिंपी यांनी देखील विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या शिक्षक मनोगत मध्ये शिवाजी पारळे सर श्री मस्कर सर व श्री सुतार सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमांमध्ये बारावी विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अकरावी सायन्स चा विद्यार्थी सिद्धेश्वर यांनी केले व आभार एस गुरव सर यांनी केले या कार्यक्रमाला आजरा महाल शिक्षण मंडळाचे सचिव एस.पी कांबळे साहेब संचालक व माजी प्राचार्य श्री देसाई सर श्री पाटील , सचिन शिंपी , श्री जाधव, सुपरवायझर शेलार मॅडम व सर्व ज्युनिअर कॉलेजचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

🛑तीन दिवसीय मोफत उद्योजकता विकास प्रशिक्षण शिबीर संपन्न.- खास. श्री. महाडिक.

कोल्हापूर.- प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टी, कोल्हापूर, धनंजय महाडिक युवाशक्ती, भागीरथी महिला संस्था, यूथ एड फाउंडेशन आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी तीन दिवसीय मोफत उद्योजकता विकास प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले. हे शिबीर यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल, मा. सौ. वैष्णवी महाडिक व भागीरथी महिला संस्थेच्या संचालक मा. रेणू देसाई यांच्या हस्ते सहभागी महिलांना सन्मानपूर्वक प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. मा. रसिका पाटील यांनी या शिबिरात सहभागी महिलांना प्रशिक्षण दिले.
या तीन दिवसीय उद्योजकता विकास शिबिरामध्ये संपन्न झालेल्या विविध कोर्सेसचा सहभागी महिलांना लाभ झाल्याबद्दल त्यांनी भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा मा. सौ.अरुंधती महाडिक यांचे यावेळी आभार मानले. व्यवसाय कल्पना निर्मितीचे बारकावे समजून घेणे, तसेच व्यवसाय वाढीचे महत्त्वाचे पैलू लक्षात घेण्यास मदत करणे. हा या प्रशिक्षणाचा उद्देश होता. यावेळी
खासदार धनंजय महाडिक यांचे सह धनंजय महाडिक युवाशक्ती, भागीरथी महिला संस्था, यूथ एड फाउंडेशन आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी सर्व सदस्य पदाधिकारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.