HomeUncategorizedआजऱ्याचे सुपुत्र 'मृत्युंजय' कार शिवाजी सावंत. - यांच्या स्मृती दालनाचे रविवारी होणार...

आजऱ्याचे सुपुत्र ‘मृत्युंजय’ कार शिवाजी सावंत. – यांच्या स्मृती दालनाचे रविवारी होणार उद्घाटन.

आजऱ्याचे सुपुत्र ‘मृत्युंजय’ कार शिवाजी सावंत. – यांच्या स्मृती दालनाचे रविवारी होणार उद्घाटन.

आजरा : प्रतिनिधी

आजरा येथे जिल्हा परिषदेच्या वतीने बांधण्यात आलेल्या मृत्युंजय कार शिवाजीराव सावंत स्मृती दालनाचे उद्घाटन रविवार दिनांक १८ रोजी सकाळी १०-३० वा. वैद्यकीय शिक्षण मंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली व उच्च व तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे .

सदर कार्यक्रमास राज्य नियोजन मंडळ महाराष्ट्राचे कार्यकारी अध्यक्ष माजी आम. राजेश क्षीरसागर, खास. धनंजय महाडीक, खास. संजय मंडलिक, खास. धैर्यशील माने, आम. प्रकाश आबिटकर, आमदार सतेज पाटील, आम. अरुण लाड, आम. जयंत आसगावकर, आम. विनय कोरे, आम. प्रकाश आवाडे, आम. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आम. पी. एन.पाटील, आम. राजू आवळे, आम. राजेश पाटील, आम. ऋतुराज पाटील, आम. जयश्री जाधव जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह मृणालिनी सावंत मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

अशी माहिती जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी दिली. सदर उद्घाटन समारंभास आजरा तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आजरा प.स. गटविकास अधिकारी संजय ढमाळ, एस.एस. नाईक उप. अभियंता बांधकाम प.स. आजरा यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.