HomeUncategorized१० लाखाच्या गोवा बनावटीच्या दारूसह १५ लाखाची गाडी असा एकूण २५ लाखाचा...

१० लाखाच्या गोवा बनावटीच्या दारूसह १५ लाखाची गाडी असा एकूण २५ लाखाचा मुद्देमाल पोलीसांनी केला जप्त 🛑काजू प्रति किलोला 200 रूपये हमीभाव मिळावा.-सिंधुदुर्ग बागायतदार प्रोड्युसर कंपनीचे तालुक्याच्या तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन.

🔴१० लाखाच्या गोवा बनावटीच्या दारूसह १५ लाखाची गाडी असा एकूण २५ लाखाचा मुद्देमाल पोलीसांनी केला जप्त
🛑काजू प्रति किलोला 200 रूपये हमीभाव मिळावा.-सिंधुदुर्ग बागायतदार प्रोड्युसर कंपनीचे तालुक्याच्या तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन.
(🛑कुडाळ पोलीसांची बुधवारी पहाटे धडक कारवाई.
तर वेंगुर्ले शहरात व तालुक्यात गेली दिड दोन वर्षे गोवा बनावटीच्या दारूची जोरदार विक्री सुरू असताना मात्र वेंगुर्ले पोलीसांनी डोळ्यावर पट्टी बांधल्याचे बोलले जात आहे.)

कुडाळ :-प्रतिनिधी

गोवा बनावटीची दारूची बेकायदा वाहतूक केल्याप्रकरणी कुडाळ पोलिसांनी दोघांवर कारवाई केली आहे.त्यांच्याकडून १० लाखाच्या दारूसह १५ लाखाची गाडी असा एकूण २५ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सर्वेश भास्कर केरकर (वय २७ रा. सातार्डा ता. सावंतवाडी) व गौरव गिरीधर केरवडेकर (वय ३४ रा. केरवडे, ता. कुडाळ) अशी दोघांची नावे आहेत.त्यातील केरवडेकर हा घटनास्थळावरून फरार झाला आहे.
ही कारवाई बुधवारी पहाटे सव्वापाच वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर बिबवणे येथे करण्यात आली. याप्रकरणी पोलीस हवालदार मंगेश शिंगाडे यांनी त्या दोघांच्याविरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केरकर याला अटक करण्यात आली असून केरवडेकर याचा शोध घेण्याचे काम कुडाळ पोलीस करत आहेत. आज, बुधवारी दुपारी महामार्गावरील बिबवणे येथे ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत गोवा बनावटीचे बॉबज व्होडका १०४ बॉक्स अशा ४ हजार ९९२ सीलबंद बाटल्या (१२० रू. प्रमाणे ५९ हजार ९४० रू.,) आणि हॉवर्ड फाईन व्हिस्की ३८४ सीलबंद बाटल्या (४६ हजार ०८० रू.), डीएसपी ब्लॅक ३४ हजार ५६०, नॅशनल गोल्डन व्हिस्की (१७ हजार २८० रू.), हनी ब्लंड ब्रेडी (१ लाख ४४ हजार), मॅक डोनाल्ड व्हिस्की (६३ हजार ३६० रू.), हनी गाईड ब्रांडी (५१ हजार ८४० रू.), रॉयल ब्रँड (५७ हजार ६००), किंगफिशर स्ट्राँग (२३ हजार ४६ रू.), १० लाख (कार महिंद्रा एसयूव्ही), मारुती स्विफ्ट कार (५ लाख) असा एकूण २५ लाख ३६ हजार ८०० रू. असा ताब्यात घेण्यात आला.

🛑काजू प्रति किलोला 200 रूपये हमीभाव मिळावा.-सिंधुदुर्ग बागायतदार प्रोड्युसर कंपनीचे तालुक्याच्या तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन.

सिंधुदुर्ग.प्रतिनिधी


शेतकरी आपली सत्ता प्रस्थापित करतील या भीतीपोटी शासन शेतकर्याच करतय खच्चीकरण पत्रकार परिषदेत अध्यक्ष विलास सावंत यांनी केला आरोप. शेतकरी भारत देशाचा कणा समजला जातो.आज शेतकर्याच्या पदरात पडतय काय याचा शासनाने विचार केलाय काय.वर्षभर शेतात राबणार्या शेतकर्याला नाकुठल वेतन मीळत किमान त्याच्या मालाला हमीभाव देण्याचा विचार सरकार करत नाही यापार्शवभूमीवर आज सिंधुदुर्ग बागायतदार प्रोड्युसर कंपनीने प्रत्येक तालुक्याच्या तहसिल कार्यालयासमोर शुक्रवार 16 फेब्रुवारीला धरणे आदोलन जाहीर केल्याने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते यावेळी कंपनीचे अध्यक्ष विलास सावंत यांनी बोलताना हे धरणे आंदोलन सर्वपक्षीय आहे.शेतकर्याच्या हितासाठी हे आंदोलन आहे.शेतकर्याला प्रतिकिलोला 200 रूपये हमीभाव मीळावा.2014 ला शरद पवार साहेब क्रुषीमंत्री असताना त्यांनी राष्ट्रीय क्रषी आयोगाच्या ( डाॅ.एम.एस.स्वामीनाथन आयोग ) आणला त्या आयोगाची अम्मल बजावणी करण्यात यावी.काजू आयातीवर 20 टक्के कर आकारण्यात यावा.जनतेने रास्त धान्य दुकानावर मीळणार्या धान्यावर अवलंबुन रहाव. शेतकरी आपली सत्ता प्रस्थापित करतील या भीतीपोटीच शेतकर्याच खच्ची करण करत असल्याचा त्यानी आरोप केला.पुढे ते म्हणाले निसर्गाच्या अनियमीतपणामुळे होणारी नूकसानी. वन्यप्राण्यानकडून होणार्या नूकसानीचे नूसते पंचनामे करून शेतकर्याच्या तोडांला पाने पुसण्याच काम शासन करत आहे.शेतकरी जर सक्षम झाला नाही तर देशाच भविष्य धोक्यात येवु शकत याच शासनाला सोएर सूतक नाही.आमदाराना महिन्याला लाखो रूपयाचे मानधन. सरकारी कर्मचार्याना सातवे वेतन.शेतकर्याला खात्यामध्ये वर्षाला चार हजार रूपये तेसुद्धा सगळ्या शेतकर्याना मीळतय कुठे.याचाच विचार करुन शेतकर्याच्या हितासाठी शुक्रवार दिनांक 16 डिसेंबर रोजी 11 वाजता प्रत्ये तालुक्याच्या तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनाला युवराज श्री. लखमराजे भोसले संस्थानीक,सावंतवाडी तालुका देवस्थान समन्वय ममीती 77 गावे , सरपंच संघटना दोडामार्ग, खरेदिविक्री संघ सावंतवाडी, सिंधुदुर्ग जिल्हा सरपंच संघटना पांठीबा दिला असल्याचे सांगीतले.यावेळी संचालक दिवाकर मावळणकर, सुरेश गावडे,नितीन सावंत उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.