🛑भादवण तिट्यावर ग्रामपंचायतने विद्युत पोलवर दिवाबत्तीची व्यवस्था करावी.- ( महिलां, शालेय विद्यार्थिनींचे.- ग्रामपंचायतला निवेदन.)
🛑श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आयोजित.- कै उर्मिला श्रीपाद मायदेव स्मृतिप्रित्यर्थ महिलांची सुगम गायन स्पर्धा संपन्न.
🛑उत्तूरच्या नवजीवन विद्यालयात टी व्ही बंदची शपथ.
पालकांनी केली पाल्यांना दोन तास टी व्ही बंद !👇👇
आजरा.- प्रतिनिधी.
भादवण तिट्यावर ग्रामपंचायतने विद्युत पोलवर दिवाबत्तीची व्यवस्था करावी. अशा मागणीचे निवेदन भादवण येथील महिलां, शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी ग्रामपंचायतला निवेदन दिले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. आम्ही महिला / मुली गडहिंग्लज/आजरा येथून रात्रीच्या वेळी गावी येत असतो. सदरच्या वेळी गावामध्ये गाडी येत नसल्यामुळे आम्हाला भादवण तिठ्यावर उतरावे लागते. सदरच्या ठिकाणी दिव्याची व्यवस्था नाही. आम्ही महिला / मुली एकट्या असतो. तिथे अंधार असतो, त्यामुळे आम्हाला भीती वाटते. अंधाराचा फायदा घेऊन सदर ठिकाणी अघटित घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तरी महिलांच्या या अडचणींचा सहानुभूती पूर्वक विचार करून ग्रामपंचायतीच्या वतीने तिठ्यावर दिव्यांची व्यवस्था लवकरात लवकर करावी, जेणेकरून अंधाराचा फायदा घेऊन महिलांच्या बाबतीत वाईट घटना घडणार नाहीत. आपण या मागणीची ताबडतोब पूर्तता करून आम्हाला संरक्षण द्यावे. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर कु. साजिया मुळीक, शर्वरी माने, नीता शेलार, वैष्णवी पाटील, उर्वी दिवेकर, दिक्षा डोंगरे, मनस्वी पाटील, उधनश्री माने, प्रज्ञा सुतार, उर्वी आजगेकर, साक्षी शिवगंड, श्रेया केसरकर, सानिका केसरकर, संस्कृती शित्रे, स्नेहल मुळीक, सानियार्थी मुठीक निकिता कवम, रेश्मा डोंगरे, सायली गोईलकर, श्रावणी कुंभार, गोपिका आजगेकर, मधूरा उत्तम गोईलकर, चिन्मयी आजगेकर सह महिला व मुलींच्या सह्या आहेत.
🛑श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आयोजित.- कै उर्मिला श्रीपाद मायदेव स्मृतिप्रित्यर्थ महिलांची सुगम गायन स्पर्धा संपन्न.
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथील श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा वतीने कै उर्मिला श्रीपाद मायदेव यांच्या स्मृतिप्रित्यर्थ महिलांची सुगम गायन स्पर्धा व मुलांची उपशास्त्रीय गायन स्पर्धा उत्साहात पार पडली. स्पर्धेची सुरवात कै. उर्मिला मायदेव यांच्या प्रतीमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. श्री नानासाहेब मायदेव सौ विनया मायदेव व सौ प्राची मायदेव यांची यावेळी प्रमुख उपस्थीती होती. अध्यक्ष डॉ. अशोक बाचुळकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. महिलांच्या सुगम गायन स्पर्धेत सौ. पूनम विजय आजगेकर (भादवण) यांनी प्रथम क्रमांक मिळविला, सौ. संगीता अशोक माधव (आजरा) यांनी व्दितीय तर कु. सुकन्या संजय शेणवी (विटे) यांनी तृतीय क्रमांक मिळवीला शालेय उपशास्त्रीय गायन स्पर्धेत प्राथमिक गटात कु. सुक्षिता राघवेंद्र तेलंग (गडहिंग्लज) हिने प्रथम क्रमांक मिळविला. व्दितीय क्रमांक कु आयुष ओमकार गिरी ( आजरा ), तृतीय क्रमांक कु आरोही तुषार पाटील (गडहिंग्लज) यांना मिळाला तर माध्यमिक गटात कु. शलाका ओमकार गिरी (आजरा) हिने प्रथम क्रमांक मिळविला. व्दितीय क्रमांक कु. विनया संतोष देसाई (कोळींद्रे) तर कु साक्षी संजय शेणवी (विटे) हिने तृतीय क्रमांक मिळविला. सुगम गायन स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून प्रा. मीना शिरगुप्पे व सौ. श्रध्दा वाटवे यांनी तर उपशास्त्रीय गायन स्पर्धेसाठी अनिकेत गाडगीळ व अभिषेक देशपांडे यांनी काम पाहिले. संगीत संयोजन श्री. निलेश अस्वले, डॉ. कृष्णा होरांबळे, सुरेंद्र हिरेमठ व प्रणय बोलके यांनी केले. यावेळी उपाध्यक्षा गीता पोतदार, कार्यवाह सदाशिव मोरे, विनायक आमणगी, सुभाष विभुते, विजय राजोपाध्ये, महंमदअली मुजावर, डॉ. अंजनी देशपांडे, शंकर ओतारी, अनिता नाईक, विद्या देशपांडे, सलोनी ठाकर, श्रध्दा डांग, डॉ गौरी भोसले, सौ. वंदना आजगेकर, ग्रंथपाल चंद्रकांत कोंडुसकर यांसह संगीतप्रेमी नागरिक उपस्थित होते. यानिमित्ताने आयोजित महिलांच्या हळदी कुंकू कार्यक्रमास महिला मोठ्या संखेने उपस्थित होत्या. संचालक वामन सामंत यांनी सुत्रसंचालन केले तर सौ विद्या हरेर यांनी आभार मानले.
🛑उत्तूरच्या नवजीवन विद्यालयात टी व्ही बंदची शपथ.
पालकांनी केली पाल्यांना दोन तास टी व्ही बंद !
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा तालुक्यातील उत्तूर येथील नवजीवन विद्यालयात येथे विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे होणारे दुर्लक्ष वाढता सोशल मिडियाचा वापर . सांयकाळी टी .व्ही पाहण्याचे वाढते प्रमाण यामुळे अभ्यासाच्या वेळी मुले अधिक टीव्ही . पाहत असल्याचे निर्दनास आले त्यानुसार शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुरेखा परीट यांचे अध्यक्षतेखाली झालेला बैठकीत सांयकाळी दोन तास टी व्ही . निर्णय घेण्यात आला. मुख्याध्यापक रवींद्र येसादे यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता १ ली ते ७वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शपथ देऊन सांयकाळी ७ . ३० ते ९ .३० वाजेपर्यंत टी व्ही बंदचा निर्णय घेण्यात दिंगबर कुंभार यांनी विद्यार्थ्यांना शपथ देऊन अधिक टीव्ही पाहण्यामुळे होणारे दुष्यपरिणाम यांची माहिती दिली. शपथ घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी टीव्ही बंद केल्याचा अभिप्राय व फोटो पाठवून उपक्रमाला चांगल प्रतिसाद दिला. यावेळी विमल कुराडे, परशराम चव्हाण यांनी मनोगते व्यक्त केली. स्वागत आशाताई साळवेकर यांनी तर सुत्रसंचालन मंगल कोरवी तर रेश्मा आजगेकर यांनी आभार मानले .आम्हांला टी .व्ही . पाहू नाही दिला. सांयकाळी टी .व्ही वरील मालिका पाहण्यासाठी टी.व्ही सुरू करण्याचा प्रयत्न केला पण शाळेत शपथ घेतली असल्याने टी . व्ही . मुलगीने सुरु करू दिली नाही . दोन तासात चांगला अभ्यास होऊ शकतो हे समजले ( दिग्वीजय पाटील – पालक ) उपक्रमाचे स्वागतच. टी .व्ही केली बंद नवजीवन विद्यालयाने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे टी व्ही. बंद मुळे पालक वर्ग मुलांच्या शिक्षणाकडे अधिक लक्ष देतील प्रथमतः गावचा नागरिक म्हणून मी प्रथम माझा टी व्ही बंद करून . मुलांच्या अभ्यासासाठी वेळ दिला . असा अनोखा उपक्रम नवजीवन विद्यालय उत्तुर येथे राबविण्यात आला.
