संकेश्वर बांदा राष्ट्रीय महामार्गाचे खाजगी जागेत अधिक अतिक्रमण का.? बांधीत शेतकऱ्यांची व्यथा.
( राष्ट्रीय महामार्गाचे काम जलद गतीने व्हावे.- यासाठी लोकप्रतिनिधी पक्षकार शांतच का..?)
संपादकीय.- संभाजी जाधव.

मागील दोन वर्षांपासून संकेश्वर बांदा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु आहे. तर यामध्ये आजरा तालुक्यातील उशिरा चालू केलेल्या कामाची पद्धत थोडी वेगळीच आहे. संत गतीने चालू असलेले काम व अनेक ठिकाणी खुदाई करून सदर ठेकेदार हे दुसऱ्या ठिकाणी खुदाया करून काम चालू करतात यासाठी आजरा शहर व महामार्गावरील काम जलद गतीने व्हावे. यासाठी लोकप्रतिनिधी व विविध पक्षाचे आंदोलन पक्षकार यांच्याकडून विचारणा होत नाही ही दुर्दैवी आहे. शासकीय जागेतून मार्ग जाताना रस्त्याच्या अंतरावर मर्यादा व खाजगी जागेत महामार्ग असल्याने ठरल्याप्रमाणे व नियम अटी प्रमाणे मग हे नियम वनविभागातुन महामार्ग जाताना का? नाहीत. रस्ता व जागाही शासनाची मग एकास एक कशासाठी दुसरीकडे आजरा शहरातील कोणतीही अतिक्रमणे न हटवता दीड पदरी रस्ता करून त्याला महामार्गाचे नाव दिलेच आहे. कोणतेही नियोजन न करता फक्त वृक्षांची कत्तल करून निसर्गाचा ऱ्हास करण्याचे काम केले गेले आहे. शंभर दीडशेहून अधिक वर्षांपूर्वीची आंबा, वड, पिंपळ, शिसम, जांभूळ, पळस यासारख्या नैसर्गिक ठेवा असलेल्या झाडांची तोड उघड्या डोळ्यांनी पाहताच निसर्ग प्रेमींच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. ही वृक्ष तोडून काहीही उपयोग झालेला नाही. मुळात तोडलेल्या वृक्षापंर्यत पोहचला नाही. मग वृक्षांची कत्तल कशासाठी असे नागरिकांचे मत आहे. पुन्हा असे वृक्ष तयार होणार का असा निसर्गप्रेमींचा प्रश्न आहे. राष्ट्रीय महामार्गाचे काम करत असताना कोणत्याही पर्यायी मार्गाचा पर्यायच न ठेवल्याने गडहिंग्लज, आजरा येथे ऊस वाहतूक करताना ट्रॅक्टर वाहनाना अडचणीचा सामना करावा लागत आहे. ट्रॅक्टर ओढण्यासाठी या कारखान्यांना लाखो रुपये खर्च करावे लागत आहेत. आधीच कारखानदारी अडचणीत आहे त्यात ऊस तोडणी वाल्यानी फसवल्यामुळे कारखाने अडचणीत असताना या रस्त्याच्या कामामुळे कारखाने अधिकच अडचणीत आले आहेत.
मागील १५ ते २० दिवसापासून अर्ध्या शहराला पाणी पुरवठा बंद आहे. काही सामाजिक कार्यकर्ते याबाबत नगरपंचायतीला निवेदने देऊन आंदोलन करण्याचे सांगत आहेत तरी सुद्धा नगरपंचायतीचे अधिकारी कानावर हात ठेऊन आहेत. रस्त्यावर असलेल्यांना टँकर ने पाणी दिले जात आहे. परंतु गल्ली बोळात असलेल्यांचे काय? नळाच्या मुख्य वाहिन्या फुटल्यामुळे त्या दुरुस्त करायच्या कोण? या वादात निम्मा आजरा बीन पाण्याचा आहे. नविन पाईप लाईन योजना करताना कशा पद्धतीने नियोजन करणार, पाईप लाईन कोणत्या बाजूने घालणार, कनेक्शन कशा पद्धतीने काढणार याचे कोणतेही ठोस नियोजन नाही. बस स्थानक ते आजरा पेट्रोल पंपापर्यंत फुटलेल्या पाईप्स ठेकेदाराने घातल्याचे समजते परंतु त्या व्यवस्थित न जोडल्यामुळे संपूर्ण रस्त्यावर हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. त्यामुळे रस्त्यावर पाणी साचून दलदल निर्माण झाली आहे.बरेच टू व्हिलरवाले घसरून पडल्याचे बोलले जात आहे. एकंदरीत भीक नको पण कुत्रं आवर अशी म्हणायची वेळ आली आहे. वेडावाकडा रस्ता करुनसुद्धा एम आय डी सी आजरा जवळ टोलनाका होणार असल्याचे समजते त्यामुळे स्थानिक नागरिकांना अर्थिक त्रास होणारच आहे. त्याचप्रमाणे लांब पल्ल्याची वाहने गोव्याला जाताना गारगोटी, दाभील मार्ग मोठा होत असल्याने त्या मार्गे जातील असाही काहींचा अंदाज आहे. टोल नाका, पाणी प्रश्न, ऊस वाहतूक, धुळीचे साम्राज्य यामुळे जनता त्रस्त आहे…रस्त्याचे काम सुरु असल्यापासून चार ते पाच युवकांना अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे. कमवते तरुण गेल्याने घराचा आधार गेला असे त्यांचे वृद्ध माता पिता डोळ्यात अश्रू आणून बोलताना दिसत आहेत. रस्ते विकासातुन विकास होतो. पण मानवी जीवन व आधारीत घटकांना नाहक त्रास होऊन सोबत वृक्ष नष्ट करून नैसर्गिक संपत्तीचा धोका होत असेल असा धोकादायक राष्ट्रीय महामार्ग कशासाठी.पाहिजे. इतक्या जलदगतीने आम्हाला जायचयं नाही…क्रमशा
