HomeUncategorizedपुनर्वसनाचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी धरणाचे काम बंद पाडणार ( सर्फनाला धरणग्रस्तांच्या मेळाव्यात...

पुनर्वसनाचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी धरणाचे काम बंद पाडणार ( सर्फनाला धरणग्रस्तांच्या मेळाव्यात निर्णय. )🛑आजरा पोलीस स्टेशनचे नुतन सहायक पोलीस निरीक्षक..- नागेश यमगर यांचे नागरिकांना आवाहन..

🛑पुनर्वसनाचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी धरणाचे काम बंद पाडणार ( सर्फनाला धरणग्रस्तांच्या मेळाव्यात निर्णय. )
🛑आजरा पोलीस स्टेशनचे नुतन सहायक पोलीस निरीक्षक..- नागेश यमगर यांचे नागरिकांना आवाहन..

आजरा- प्रतिनिधी.

सर्फनाला धरणाचे काम पूर्णत्वाकडे आले असून पुनर्वसनाचे काम मात्र अजूनही रखडले आहे. यावर्षी धरणात पाणी तुंबविले जाणार असून घळभरणीचं काम सुरू करण्यापूर्वी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत प्रकल्पग्रस्त व संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक होणे आवश्यक होती पण ती बैठक जोल्हाधिकारी यांनी घेतलेली नाही. त्यामुळे आलेल्या नवीन आलेले जिल्हाधिकारी संबंधित सर्व अधिकाऱ्यांची प्रकल्पग्रस्तांसाह बैठक घेऊन पुनर्वसनाचे प्रश्न सोडवण्याची खात्री देत नाहीत तोपर्यंत धरणाचे काम बंद पाडण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या मंगळवारी ६ तारखेला पारपोली, गावठाण आणि खेडगे गावातील स्त्री-पुरुष मोर्चाने जाऊन धरणाचे काम बंद पाडतील असा निर्णय केला आहे. यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉ संपत देसाई, अशोक मालव, प्रकाश शेटगे, प्रकाश कविटकर, संतोष पाटील, शंकर ढोकरे, गोविंद पाटील, श्रावण पवार यांच्यासह स्त्री पुरुष मोठ्या संखतेने उपस्थित होते.

🛑आजरा पोलीस स्टेशनचे नुतन सहायक पोलीस निरीक्षक..- नागेश यमगर यांचे नागरिकांना आवाहन..

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथील आजरा पोलीस स्टेशनचे नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांनी आजरा तालुक्यातील नागरिकांना तालुक्यातील शांतता अबाधित राहावी.
कायदा सुव्यवस्थेचे पालन करावे,
सोशल मीडियावर चुकीच्या पोस्ट शेअर करू नये.
तालुक्यातील नागरिकांनी गुण्यागोविंदाने एक एकसंघ राहावं.. आपापसातील असणारे वाद हे भांडणात रूपांतर न होता पोलीस स्टेशनची मदत घेऊन सोडवावेत. यासाठी आपल्याला पोलीस स्टेशन नेहमी सहकार्य करेल तसेच तरुण पिढीने वाहतुकीचे नियम पाळावे राष्ट्रीय महामार्गाचे काम चालू आहे. वाहने सावकाश हकावी, नियमानुसार हेल्मेट नेहमी वापरावे.
तालुक्यातील नागरिकांना नेहमी आजरा पोलीस स्टेशनचे सहकार्य राहील.
व कायद्याचे व नियमाचे उल्लंघन होऊ नये याची दक्षता नागरिकांनी घ्यावी सोबत काय आवाहन केले पहा तर नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री यमगर सह्याद्री न्यूज मराठी महाराष्ट्र चायनलशी बोलताना म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.