HomeUncategorizedबिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकुर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर -🛑 डांबर...

बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकुर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर -🛑 डांबर नाही रस्त्याला निकृष्ट दर्जाच्या कामाची तक्रार केली तर अधिकारी म्हणतात – तू काम बंद करूनच दाखव तूझ्यावर शासकिय कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल करतो दिली अधिकाऱ्याने धमकी सरपंचाना. 👇👇

🛑 बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकुर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर.
🛑 डांबर नाही रस्त्याला निकृष्ट दर्जाच्या कामाची तक्रार केली तर अधिकारी म्हणतात – तू काम बंद करूनच दाखव तूझ्यावर शासकिय कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल करतो दिली अधिकाऱ्याने धमकी सरपंचाना. 👇👇

नवी दिल्ली: वृत्तसंस्था.

बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकुर यांना देशातील सर्वाच्य पुरस्कार समजला जाणार भारतरत्न जाहीर करण्यात आला आहे. कर्पूरी ठाकुर हे दोनवेळा बिहारचे मुख्यमंत्री होते.तसेच ते त्यांच्या साध्या राहणीमानासाठी प्रसिद्ध होते. कर्पूरी ठाकुर यांची बुधवारी म्हणजे 24 जानेवारी रोजी शंभरावी जयंती आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.बिहारमध्ये जातीय जनगणना आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकीय वातावरण तापलं असताना केंद्र सरकारने कर्पूरी ठाकुर यांना या सर्वोच्च पुरस्काराने गौरवलं आहे.
🛑कोण आहेत कर्पूरी ठाकुर?
कर्पुरी ठाकुर हे बिहारच्या सर्वच राजकीय पक्षांना आदर्श असं व्यक्तिमत्व आहे. मागासवर्गीय समाजाचा विकास आणि सामाजिक न्यायाची कल्पना ही तळागाळात पोहोचवण्यासाठी कर्पूरी ठाकूर हे ओळखले जातात. बिहारच्या राजकारणात कर्पूरी ठाकुर हे अतिशय सन्माननीय नाव आहे.
🟥कर्पूरी ठाकूर यांचा जन्म 24 जानेवारी 1924 रोजी बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील पितौंझिया या गावा झाला. 1952 मध्ये ते बिहार विधानसभेत आमदार म्हणून निवडून आले आणि 1988 पर्यंत ते 36 वर्षे बिहार विधानसभेचे सदस्य म्हणून काम केलं. या काळात त्यांनी दोन वेळा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून काम केलं. एवढी मोठी राजकीय कारकीर्द असली तरीही कर्पूरी ठाकूर हे सर्वात गरीब नेते म्हणून ओळखले जात होते.
🔴कर्पूरी ठाकुर यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यांनी तळागाळातील समाजाला शिक्षण मिळावं यासाठी पुढाकार घेतला. तसेच त्यांनी मोठ्या प्रमाणात जमीन सुधारणांना हात घातला. त्यामुळे बड्या जमीनदारांकडून भूमीहिन दलितांकडे जमिनीचं हस्तांतर झालं.
🛑मुलीच्या लग्नाची रंजक कथा.
कर्पूरी ठाकुर यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत भत्त्याशिवाय कोणाकडून एक पैसाही जादा घेतला नाही. आपल्या स्वच्छ प्रतिमेसाठी ओळखल्या जाणाऱ्या कर्पूरी ठाकूर यांच्या अनेक कथा आहेत. त्यातली एक रंजक गोष्ट त्याच्या मुलीच्या लग्नाची आहे. कर्पूरी ठाकूर 1970 ते 71 या काळात मुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांना आपल्या मुलीसाठी मुलगा शोधण्यासाठी रांचीला जावे लागले. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांचे अधिकृत वाहन न वापरता टॅक्सी करून रांचीला गेले.
🟥कर्पूरी ठाकुर यांच्या मुलीचं लग्न अगदी साधेपणाने झालं. त्यांनी त्या लग्नासाठी कोणत्याही नेत्याला किंवा त्यांच्या मित्रांना आमंत्रित केले नाही. इतकं की मुख्यमंत्र्यांसोबत राहणारे सुरक्षा कर्मचारी आणि जिल्हा प्रशासनातील कुणीही त्या लग्नासाठी उपस्थित नव्हते.
कर्पूरी ठाकूर इतके दिवस आमदार आणि मुख्यमंत्री राहिले पण त्यांना गाडीही घेता आली नाही.

डांबर नसल्याने निकृष्ट दर्जाच्या कामाची तक्रार केली तर अधिकारी म्हणतात – तू काम बंद करूनच दाखव तूझ्यावर शासकिय कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल करण्याची दिली अधिकाऱ्याने धमकी सरपंचाना.

सावंतवाडी:- प्रतिनिधी.

कास रसत्याचे सात कीलोमीटर डांबरीकरण, मोर्या बांधण्याचे काम सुरू आहे.सदरच्या कामाची पहाणी करण्यासाठी कास सरपंच प्रवीण पंडित गेले होते त्या दरम्याने कामगारानी डाबंर मारण्यापूर्वी खडी पसरत असल्याचे पंडीत यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी अशाप्रकारे काम करूनका काम थांबवण्यास सांगीतले.पंडीत हे स्वतःहा सार्वजनीक बांधकाम कार्यालयात जावुन कनिष्ठ अभीयंता ईश्वर बामणे यांना कामाची कल्पना देवुन अशाप्रकारचे करायला देणार नसल्याचे सांगीतले. यावेळी ईश्वर बामणे हे संत्प्त झाले आणि त्यांनी पंडीत यांना अरेतुरेची भाषा वापरत तू काम बंद करूनच दाखव तूझ्यावर शासकिय कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली.सरपंचाना धमकी दिल्याने कास ग्रामस्थ आक्रमक झाले.आक्रमक झालेल्या ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य हे सुरू असलेल्या ठीकाणी जावुन काम बंद पाडले.ग्रामसाथानी दुरध्नीवरून बामणे यांना संपर्क करून त्वरीत येवुन कामाची पहाणी करण्यास सांगीतले.मात्र बामणे यांनी येण्यास मुद्दाम ऊशीर केला तब्बल दोन तासानंतर बामणे हजर झाले.आक्रमक झालेल्या ग्रामस्थानी बामणे यांना घेराव घालुन धारेवर धरले.सदरचे काम कशाप्रकारे सुरू आहे ते दाखवुन आता आमच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी ग्रामस्थानी केली.ज्या बामणेनी सरपंचाना धमकी दिली होती त्या बामणेची बोलतीच बंद झाली.आक्रमक झालेल्या ग्रामस्थानी बामणे यांची चांगलीच कान ऊघडणी केली. गारामस्थानी बामणे यांनी स्वतःहा उभे राहुन करून घेण्यास खडसावले.अखेर बामणे यांनी माफी मागुन आपण स्वतःहा उभे राहुन काम करून घेणार असल्याचे मान्य केले.ठेकेदाराने मुकादमला योग्यप्रकारे काम करून घेण्यास सांगुनही मुकादमाने हेळसाड केल्याने सरपंच यांनी बामणे यांच्या निदर्शनास आणले.मात्र बामणे यांच्या उध्दटपणामुळे नाहक ग्रामस्थाना मनस्थाप भोगावा लागला.
यावेळी उप सरपंच श्रेया राणे,ग्रामपंचायत सदस्य रूक्मीणी पंडीत,ग्रामस्थ देवीदास सातार्डेकर,महादेव राणे,रामदास कासकर,नारायण पंडीत,प्रणय राणे,शांताराम राणे,शशिकांत पंडीत,गुरू कासकर,सुरेश गावडे,प्रकाश वालावलकर यांच्यासह मोठ्यासंख्येने ग्रामस्थ ऊपस्थीत होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.