आजरा साखरच्या पंचवार्षिक निवडणुकीतील बोगस मतदान बाबत. – जिल्हा पोलीसप्रमुख महेंद्र पंडित यांना चाळोबा देव आघाडीचे निवेदन
कोल्हापूर ( प्रतिनिधी )

आजरा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत तालुक्यातील मडिलगे येथील बुथ क्रमांक १८ वरती जवळपास ३५० ते ४०० बनावट आधारकार्डचा वापर करून बोगस मतदान केले असल्याचा आरोप चाळोबादेव शेतकरी विकास आघाडीच्यावतीने करण्यात आला होता. याबाबत आजरा पोलीस स्टेशनमध्ये संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी श्री चाळोबा देव विकास आघाडी यांच्या वतीने करण्यात आली होती.आज दि ४ जानेवारी रोजी
भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे यांच्यासह प्रमुक कार्यकर्त्यांनी आज जिल्हा पोलिस प्रमुखांची भेट घेतली असून याबाबतचे निवेदन दिले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मडिलगे येथील बुथ क्रमांक १८ वर ३५० ते ४०० बोगस मतदान करण्यात आले आहे. हे बोगस मतदान करणाऱ्या मुख्य आरोपींवर कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी व या घटनेमागील सूत्रधारांचा तात्काळ शोध घ्यावा, यासाठी चाळोबादेव शेतकरी विकास आघाडीच्यावतीने जिल्हा पोलीसप्रमुख महेंद्र पंडित यांच्याकडे निवेदन दिले. या प्रकरणात पोलिसांनी तीन बोगस मतदान करण्यासाठी आलेले व एक मतदान केलेले सापडलेले व्यक्ती अटक यांना केली होती.
यावेळी गुन्ह्याची कबूली दिली होती. मात्र त्यांच्यावरती अत्यंत जुजबी कारवाई करून
त्यांना सोडून देण्यात आले. त्यामुळे त्यांच्यावर उच्चतम कलमांखाली कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. यावेळी आजरा साखर कारखान्याचे माजी संचालक अशोक
चराटी, माजी सभापती भिकाजी गुरव, पुलिंग एजंट सदानंद पाटील, सह पदाधिकारी मारुती येसने आदी उपस्थित होते.
