🛑चार वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना ‘हे’ कफ सिरप देऊच नका.- 👉DCGI चा.👇 फार्मास्युटिकल कंपन्यांना इशारा.
🛑 सिंधुदुर्ग एलसीबीची कौतुकास्पद कामगिरी..दोन तासांत चोराला पकडले..
सिंधुदुर्ग:- प्रतिनिधी.
कणकवली शहरातील पेडणेकर ज्वेलर्स समोरून 19 डिसेंबर रोजी चोरीस गेलेल्या ऍक्टिव्हा दुचाकीसह चोरटा किशोर मारुती खरात (वय 23, रा. नाटळ, ता कणकवली) याला सिंधुदुर्ग एलसीबी चे उपनिरीक्षक आर बी शेळके यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या दोन तासांत शिताफीने कुडाळ तालुक्यातील अणाव गावात पकडले.
वायरी मालवण येथील मयेकर दाम्पत्य 19 डिसेंबर रोजी भालचंद्र महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्यासाठी कणकवलीत आले होते. भालचंद्र महाराजा मठात दर्शन घेतल्यानंतर अस्मिता मयेकर व त्यांचे पती त्यांच्या मालकीची ऍक्टिव्हा दुचाकी (MH 07 – AL – 5204 ) पेडणेकर ज्वेलर्स शो रूम सायंकाळी समोर पार्क केली होती. मात्र त्यानी ऍक्टिव्हाची चावी गाडीलाच लावून ठेवली होती. या संधीचा फायदा घेत चोरटा किशोर खरात याने ऍक्टिव्हा चोरून नेली होती.
ऍक्टिव्हा चिरतानाचे सीसीटीव्ही फुटेज पोलीस ठाण्याच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. या चोरीची फिर्याद मयेकर यांनी 20 डिसेंम्बर रोजी सायंकाळी 4 वाजून 40 मिनिटांनी कणकवली पोलीस ठाण्यात दाखल केली होती. चोरीची फिर्याद दाखल झाल्यानंतर एसपी अग्रवाल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले, एलसीबी पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पोलीस निरीक्षक आर बी शेळके यांच्या नेतृत्वाखाली एलसीबी पोलीस हवालदार राजेंद्र जामसंडेकर, किरण देसाई, आशिष जमादार यांच्या पथकाने शिताफीने चोरटा किशोर खरात याला ऍक्टिव्हा दुचाकीसह अणाव गावातून ताब्यात घेतले. चोरीस गेलेली दुचाकी व आरोपी किशोर खरात याला कणकवली पोलिसांचा हवाली केले असून अधिक तपास कणकवली पोलीस करत आहे.
🛑चार वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना ‘हे’ कफ सिरप देऊच नका.- 👉DCGI चा फार्मास्युटिकल कंपन्यांना इशारा.
नवी दिल्ली :- वृत्तसंस्था.
भारताच्या औषध नियामक (DCGI) नं चार वर्षांच्याखालील मुलांसाठी सर्दी आणि खोकल्याचं कफ सिरप वापरण्यावर बंदी घालण्याचे निर्देश जारी केले आहेत.
🔴DCGI नं 18 डिसेंबर रोजी सर्व राज्यांना पत्र लिहून क्लोरफेनिरामाइन मॅलेट आणि फेनिलेफ्राइन या दोन औषधांच्या कॉकटेलचा वापर करून तयार केलेल्या सिरपच्या पॅकेजिंगवर लेबल लावण्यास सांगितलं आहे.मॅलेट आणि फेनिलेफ्राइन या दोन औषधांच्या मिश्रणातून तयार केलेलं कफ सिरप किंवा गोळ्या सामान्य सर्दीच्या लक्षणांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जातात. सिरपच्या वापरामुळे जगभरात 141 मुलांचा मृत्यू झाल्यामुळे ही बंदी घालण्यात आली आहे. या दोन्ही औषधांचा वापर करून तयार केलेल्या सिरपचे लेबलिंग तात्काळ अद्ययावत करण्याच्या सूचनाही सर्व औषध कंपन्यांना देण्यात आल्या आहेत.
🟥कोकाटे समितीच्या शिफारशीवर आधारित निर्णय
राज्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे की, “क्लोरफेनिरामाइन मॅलेट आयपी 2mg + फेनिलेफ्रिन HCI IP 5mg ड्रॉप/ml चा निश्चित डोस संयोजन प्राध्यापक कोकाटे यांच्या समितीनं तर्कसंगत घोषित केलं आहे आणि समितीच्या शिफारशीच्या आधारावर, या कार्यालयानं मंजूर “एफडीसीच्या धोरणात्मक निर्णयानुसार, 17 जुलै 2015 रोजी एफडीसी विषयाचं उत्पादन आणि विपणन चालू ठेवण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) जारी केलं गेलं आहे.”पत्रात पुढे म्हटलं आहे की, अर्भकांसाठी अप्रमाणित एंटी-कोल्ड ड्रग फॉर्म्युलेशनच्या जाहिरातीनंतर या गोष्टी समोर येत आहेत. या विषयांवर चर्चा झाली. विषय तज्ज्ञ समितीची (SEC- पल्मोनरी) 6 जून, 2023 रोजी बैठक झाली, ज्यामध्ये FDC म्हणून Chlorpheniramine Maleate IP 2mg + Phenylephrine HCl IP 5mg Drop/ml च्या वापराबाबत समितीसमोर चर्चा करण्यात आली.
🛑कंपन्यांना पॅकेजिंगवरही सूचना लिहण्याचे निर्देश
“समितीनं शिफारस केली आहे की, FDCs 4 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये वापरू नयेत आणि त्यानुसार कंपन्यांनी लेबल आणि पॅकेज इन्सर्टवर या संदर्भात चेतावणींचा उल्लेख करावा,” असं पत्रात म्हटलं आहे.
🟥DCGI च्या आदेशावर बालरोगतज्ञ काय म्हणाले?
या संदर्भात वृत्तसंस्थेनं दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयाचे ज्येष्ठ बालरोगतज्ञ डॉ. धीरेन गुप्ता यांच्याशी चर्चा केली. ते म्हणाले की, “Chlorpheniramine maleate + phenylephrine hydrochloride ची शिफारस 1 वर्षांखालील मुलांसाठी केली जात नाही. 2 ते 4 वर्षे वयोगटातील मुलांसाठी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो. जरी हे औषध लिहून दिलेलं असलं तरी ते अत्यंत कमी डोसमध्ये वापरावं आणि अल्प कालावधीसाठी कारण त्यामुळे मूर्च्छित होण्यासारखे दुष्परिणाम होऊ शकतात.
एसईसीच्या शिफारशीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे आणि सर्व उत्पादकांना लेबल आणि पॅकेज इन्सर्ट/प्रमोशनवर एफडीसी 4 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये वापरू नये अशा चेतावणींचा उल्लेख करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

