HomeUncategorizedआजरा साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीत श्री रवळनाथ आघाडीचा १९ जागांवर विजय..

आजरा साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीत श्री रवळनाथ आघाडीचा १९ जागांवर विजय..

आजरा साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीत श्री रवळनाथ आघाडीचा १९ जागांवर विजय..

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादीची रवळनाथ विकास आघाडी विरुद्ध भाजप, काँग्रेस, शिवसेना शिंदे व ठाकरे गट यांच्या चाळोबा देव शेतकरी विकास आघाडीला एका जागेवर समाधान मानावे लागले. तर रवळनाथ आघाडीला १९ जागा मिळाल्या
चाळोबा देव शेतकरी विकास आघाडीची एक जागा बिनविरोध निवडून आली आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली रवळनाथ आघाडी तर माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार विनय कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली चाळोबा देव आघाडीने निवडणूक लढवली. मोठ्या चुरशीने झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी आघाडीने सुमारे हजार मतांच्या फरकाने जागा जिंकल्या. या निवडणुकीत विद्यमान नऊ संचालक पराभूत झाले. विद्यमान अध्यक्ष सुनील शिंत्रे, अण्णाभाऊ संस्थाप्रमुख अशोक चराटी, गोकुळ दूध संघाच्या संचालिका अंजना रेडेकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उमेश आपटे, अभिषेक शिंपी यांचा पराभव झाला आहे. या निवडणुकीत दोन्ही आघाडीच्या उमेदवारांना मिळालेली मते….

उत्पादक गट नंबर १ (उत्तूर-मडिलगे) :
🛑रवळनाथ विकास आघाडी –
मारुती घोरपडे (उत्तूर) – 8562
दीपक देसाई (मडिलगे) – 8498
वसंतराव धुरे (उत्तूर) – 8753

🛑चाळोबा विकास आघाडी –
प्रकाश चव्हाण (चव्हाणवाडी) – 7038
उमेश आपटे (उत्तूर) – 8073
भिकू गुरव (मडिलगे) – 7360

गट नंबर २ (आजरा-श्रृंगारवाडी गट ) :
रवळनाथ विकास आघाडी –
मुकुंद देसाई(आजरा) – 8691
शिवाजी नांदवडेकर (वाटंगी) – 8040
सुभाष देसाई (सिरसंगी) – 8231

🛑चाळोबा विकास आघाडी –
अशोक चराटी (आजरा) – 7495
अभिषेक शिंपी (आजरा) – 7385
विजय देसाई (वाटंगी) – 7067

अपक्ष –
दिगंबर देसाई (सिरसंगी) – 126
महादेव होडगे (यमेकोंड) – 80
तुळसाप्पा पोवार (देऊळवाडी) – 231

गट नंबर ३ (पेरणोली-गवसे गट ) :
🛑रवळनाथ विकास आघाडी –
उदयराज पवार (पेरणोली) – 8555
रणजीत देसाई (सुलगांव) – 8693
गोविंद पाटील (घाटकरवाडी) – 8351

🛑चाळोबा विकास आघाडी –
राजेंद्र सावंत (पेरणोली) – 6930
दशरथ अमृते (हाळोली) – 7162
सहदेव नेवगे (गवसे) – 7035

अपक्ष – शांताराम पाटील (दाभिल) – 381
शामराव बोलके (माद्याळ) – 160

गट नंबर ४ (भादवण-गजरगाव गट )
🛑रवळनाथ विकास आघाडी –
एम. के. देसाई (सरोळी) – 8800
राजेश जोशीलकर (भादवण) – 8760
राजेंद्र मुरकुटे (कानोली) – 8199

🛑चाळोबा विकास आघाडी –
अजंना रेडेकर (पेद्रेवाडी) – 7717
सुधीरकुमार पाटील (कानोली) – 7123
संजय पाटील (भादवण) – 7243
अपक्ष –
आनंदा पाटील (सरोळी) – 147
गट नंबर ५ (हात्तिवडे-मलिग्रे गट) :
🛑रवळनाथ विकास आघाडी –
विष्णूपंत केसरकर (किणे) – 8926
अनिल फडके (सुळे) – 8524
संभाजी पाटील(हात्तिवडे) – 8788

🛑चाळोबा विकास आघाडी –
सुनिल शिंत्रे (मेंढोली) – 7937
आनंदराव बुगडे (मलिग्रे) – 7312
सुरेश सावंत (कोळिंद्रे) – 7194

बिगर उत्पादक गट (ब वर्ग ) :
🛑रवळनाथ विकास आघाडी –

नामदेव नार्वेकर (पोळगांव) – 1380 (पराभूत)

🛑चाळोबा विकास आघाडी –
अशोक तर्डेकर (मलिग्रे) – 1384 (विजयी)

अनुसूचित जाती जमाती :
🛑रवळनाथ विकास आघाडी –
हरिभाऊ कांबळे (पेरणोली) -10356

🛑चाळोबा विकास आघाडी –
मलिककुमार बुरूड (आजरा) – 9015

इतर मागास.
🛑रवळनाथ विकास आघाडी –
काशिनाथ तेली (होन्याळी) – 9823

🛑चाळोबा विकास आघाडी –
जनार्दन टोपले (आजरा) – 9446

महिला प्रतिनिधी :
🛑रवळनाथ विकास आघाडी –
रचना होलम(पोळगांव) – 9870
मनिषा देसाई (वेळवट्टी) – 10246

🛑चाळोबा विकास आघाडी –
सुनिता रेडेकर (सरंबळवाडी) – 8908
संगीता माडभगत (साळगाव) – 8441

असा आजरा सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल असून. निवडणूक निर्णय अधिकारी सर्व कर्मचारी यांनी पोलिस यंत्रणा यांनी चांगल्या पध्दतीने काम पाहिले. निवडणूक निकालानंतर उमेदवार कार्यकर्ते यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.